हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) जंगल सफारी म्हणजे नुसती मजा. एक वेगळा अनुभव आणि वेगळी आठवण गाठीशी बांधायची असेल तर आयुष्यात एकदा तरी जंगल सफारी जरूर करायला हवी. जंगल सफारीचा अनुभव हा अतिशय वेगळा आणि अविस्मरणीय असतो. कारण जंगल सफारीच्या माध्यमातून निसर्गाला जवळून पहायची संधी मिळते. जिथे आपण एकटे जंगलात जायचा विचारही करत नाही तिथे आपल्याला अचानक जंगल प्रिय वाटू लागतं. जंगल सफारीतून हिंस्र प्राण्यांना अगदी जवळून पाहता येतं. त्यांचं जीवनमान जाणून घ्यायला मिळतं.
पण अनेकदा जंगल सफारी दरम्यान काही प्राणी वाहनाजवळ येतात. तर कधी पर्यटकांवर हल्लेसुद्धा करतात. अशा अनेक बातम्या आपण अनेकदा वाचल्या असतील. (Viral Video) असाच एक थरारक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. या व्हिडिओत काही पर्यटक जीपमधून जंगल सफारीचा आनंद घेताना दिसत आहेत. अशातच त्यांच्या मजेशीर प्रवासात थरकाप उडवणारा प्रसंग घडताना दिसतो. त्यांच्या गाडीसमोर एक वाघ येतो आणि पुढे….. काय झालं ते आपण व्हिडिओत पाहूया.
सोशल मीडिया इंस्टाग्रामवर joju_wildjunket नावाच्या हँडलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. जो काही क्षणासाठी का होईना श्वास रोखणारा आहे. वाघ हा जंगलातील सर्वात धोकादायक प्राणी आहे. (Viral Video) जो नुसत्या चाहुलीवर शिकार करतो आणि आपल्या भक्ष्याचे लचके तोडतो. असा वाघोबा चित्रात कितीही मस्त वाटला तरी समोर आल्यावर अंगातून घाम निघतोच. माणसं काय वाघाला तर प्राणीसुद्धा घाबरतात. असाच एक चित्त थरारक प्रसंग या व्हिडिओत पहायला मिळतो आहे. या व्हिडीओत दिसतंय की, काही लोक जंगल सफारीसाठी गेले आहेत.