हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण यातील सगळेच व्हिडिओ बिनकामाचे किंवा व्यर्थ असतात, असं काही नाही बरं का!! यातले बरेच व्हिडिओ असे सुद्धा असतात ज्यामध्ये विविध कल्पनांचा वापर केलेला दिसतो. यातून अनेक लोकांचे नवनवीन विचार हे इतरांसमोर येतात. तसेच एखादा व्हिडिओ बनवण्यासाठी घेतलेली मेहनत आणि अशा व्हिडिओत दिसणारी दृश्य कधीकधी आपल्याला थक्क करून टाकतात. असाच एक गजब जुगाडवाला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ काय आहे? ते एकदा बघाच.
अनेकदा छोट्या मोठ्या एक्सीडेंट मध्ये किंवा तांत्रिक बिघाड्याने दुचाकीची हेडलाईट खराब होते अथवा फुटते अशावेळी एकतर नवीन हेडलाईट बसवून घ्यावी लागते किंवा मग अंधारात गाडी चालवणे टाळावे लागते. (Viral Video) पण या व्हिडिओतील तरुणांना लावलेली शक्कल पाहून तुम्हाला आश्चर्य वाटलं नाही तर नवलंच कारण असा जुगाड याआधी कुणी विचारही केला असेल असं काही वाटत नाही. या व्हिडिओत आपण पाहू शकतो की, एका तरुणाची जुनी दुचाकी आहे. पण या दुचाकीला हेडलाईट नाही. म्हणून हा तरुण एक कमालीचा जुगाड करतोय.
दुचाकीचे हेडलाईट अंधाराच्यावेळा दिशादर्शक म्हणून काम करते. मग अशावेळी हेडलाईट नसून कसं चालेल? म्हणूनच हेडलाईटची कमी पूर्ण करण्यासाठी या तरुणाने चक्क एका मेणबत्तीचा वापर केला आहे. (Viral Video) इतकच काय तर ही मेणबत्ती विझू नये म्हणून तिच्यासमोर काचसुद्धा लावली आहे. दुचाकी सुरू करण्याआधी तो ही काच उघडतो आणि मेणबत्ती लावून दुचाकी वर स्वार होऊन निघून जातो. असा हा काही मिनिटाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.या व्हायरल व्हिडिओतील तरुणाने हेडलाईटच्या जागी मेणबत्तीचा वापर करून एका नव्या कल्पनेचा उदय केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या तरुणाचा व्हिडिओ आणि त्याचा जुगाड दोन्हीही प्रचंड चर्चेत आहे.