हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Water Dam Storage – हवामानात गेल्या काही दिवसापासून मोठे चढ उतार होताना दिसत आहे. फेब्रुवारी महिना सुरु होताच उष्णेतेचा पारा वाढलेला आहे. त्यामुळे अनेकांना यंदा पाण्याचा पुरवठा कमी पडतोय कि काय याची चिंता आहे. पण यावर्षी पाण्याची चिंता भासेल अशी चिन्हे दिसत नाहीत. कारण राज्यातील जलसाठ्याची स्थिती पाहता यंदा पाणी पुरेसे असल्याचे दिसते. समाधानकारक पाऊस झाल्यामुळे राज्यातील मोठ्या धरणांमध्ये 70 % (Water Dam Storage) पेक्षा जास्त जलसाठा आहे. मागील वर्षाच्या तुलनेत जलसाठ्याच्या प्रमाणात 20 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे पाण्याचा पुरवठा कमी होणार नाही. तर चला कोणत्या विभागात किती टक्के पाण्याचा साठा आहे जाणून घेऊयात.
विभागानुसार जलसाठाचे प्रमाण (Water Dam Storage) –
राज्यात तब्बल 138 मोठी धरणे असून, त्यामध्ये सरासरी 69.40 % जलसाठा आहे.
नाशिक विभागातील 22 धरणांमध्ये सर्वाधिक 76 टक्के जलसाठा आहे.
संभाजीनगर विभागात 44 धरणांमध्ये 73.20 टक्के साठा आहे.
अमरावती विभागातील 10 धरणांमध्ये 69 टक्के जलसाठा आहे.
पुणे विभागातील 35 धरणांमध्ये 70 % साठा आहे.
नागपूर विभागातील 16 धरणांमध्ये 60 % साठा आहे.
कोकणातील 11 धरणांमध्ये 64 % जलसाठा आहे.
प्रकल्पांच्या कार्यक्षमतेतही सुधारणा –
मध्यम जलस्रोतांमध्ये सरासरी 65 % जलसाठा (Water Dam Storage) आहे, जो गतवर्षीच्या तुलनेत 11% अधिक आहे, यामुळे या प्रकल्पांच्या कार्यक्षमतेतही सुधारणा झाली आहे. कोकण विभागातील 8 प्रकल्प 83% भरलेले आहेत, तर अमरावती विभागातील 35 प्रकल्पांमध्ये 72% साठा आहे. पुणे विभागातील 50 प्रकल्पांमध्ये 66% साठा असून, नाशिक विभागातील 54 प्रकल्पांमध्ये 63% साठा आहे. दुसरीकडे, लघू जलप्रकल्पांमध्ये सरासरी जलसाठा 48.74% आहे, जो गतवर्षीच्या तुलनेत 7% जास्त आहे. कोकण विभागातील लघू प्रकल्पांमध्ये 70% साठा आहे, अमरावती विभागात 60% साठा असून, संभाजीनगर आणि नाशिक विभागांमध्ये 40% जलसाठा आहे. पुणे विभागातील लघू प्रकल्पांमध्ये 48% साठा आहे.
जलसाठा 20 टक्के जास्त –
वर्ष 2025 च्या या जलसाठ्याच्या (Water Dam Storage) स्थितीवरून असे दिसते की राज्यातील जलस्रोतांची स्थिती खूपच सुधारलेली आहे, आणि जलसाठ्याचे प्रमाण प्रामुख्याने उत्तम आहे. मागील वर्षीच्या तुलनेत जलसाठा 20 टक्के जास्त असल्यामुळे आगामी उन्हाळ्यात पाणी टंचाईची शक्यता कमी आहे.




