मुंबईच्या वाहतुकीला जलद गती! लवकरच ‘या’ मार्गावरून धावणार ‘वॉटर मेट्रो’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबईकरांसाठी लवकरच एक नवीन आणि वेगळी वाहतूक सेवा सुरू होणार असून, ती म्हणजे ‘मुंबई वॉटर मेट्रो’. शहरातील वाढती वाहतूक कोंडी, लोकल ट्रेनवरील ताण आणि प्रदूषण यावर पर्याय म्हणून राज्य सरकारने या जलवाहतूक प्रकल्पाची तयारी सुरू केली आहे. ही सेवा डिसेंबर २०२६ पासून सुरू होण्याची शक्यता आहे. प्रारंभी आठ जलमार्गांवर ही सेवा कार्यरत राहील, ज्यामुळे मुंबईतील हजारो प्रवाशांना दररोज एक जलद, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

या प्रकल्पासाठी कोची वॉटर मेट्रोचे मॉडेल घेतले गेले आहे. कोचीमधील वॉटर मेट्रो ही भारतातील पहिली जलवाहतूक सेवा असून, ती २०२३ मध्ये सुरू झाली. कोची मेट्रो रेल लिमिटेड (KMRL) आणि कोची शिपयार्डकडून मुंबई प्रकल्पासाठी तांत्रिक सहकार्य घेतले जात आहे. जर्मन बँकेकडून आर्थिक सहाय्य मिळाल्यामुळे अत्याधुनिक हायब्रिड इलेक्ट्रिक बोटींसह एसी टर्मिनल्स, स्वयंचलित दरवाजे, वायफाय, सीसीटीव्ही अशा सुविधा या सेवेत असतील.

सुरुवातीच्या टप्प्यात नरिमन पॉइंट ते वांद्रे आणि वांद्रे ते वर्सोवा हे दोन मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. उर्वरित सहा मार्ग सप्टेंबर २०२५पर्यंतच्या अंतिम अहवालानंतर ठरवले जातील. या व्यतिरिक्त वाशी, बेलापूर, मुलुंड, ऐरोली, मीरा-भाईंदर, बोरिवली, चाकण अशा भागांमधूनही वॉटर मेट्रोचे जलमार्ग असतील.

खुशखबर ! ‘अमृत भारत स्टेशन योजना’अंतर्गत 103 स्टेशन्सचे नवे रूप, काय आहेत सुविधा?

या सेवेसाठी कॉमन कार्ड प्रणाली देखील लागू करण्याचा विचार आहे. त्यामुळे प्रवाशांना लोकल ट्रेन, मेट्रो, बस आणि वॉटर मेट्रो यांसाठी एकाच कार्डचा वापर करता येईल. याशिवाय, मोबाईल अ‍ॅप, QR कोड द्वारे तिकीट बुकिंग अशी डिजिटल सेवा देखील मिळेल.

मुंबई वॉटर मेट्रो ही केवळ एक वाहतूक सेवा नसून, ती मुंबई शहराच्या भविष्यातील शाश्वत विकासाचा भाग ठरणार आहे. ट्रॅफिकमुक्त, जलद आणि सुरक्षित प्रवासासाठी हा प्रकल्प एक मोठा टप्पा ठरेल यात शंका नाही. सरकारच्या या पावलामुळे मुंबईला जलवाहतुकीद्वारे नवसंजीवनी मिळण्याची शक्यता आहे.