औरंगाबाद । जवळील दौलताबाद येथील H2O वॉटर पार्कमधील कर्मचाऱ्यांचे लॉकडाऊन मुळे होत आहेत प्रचंड हाल होत असून. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबाद जवळच जागतिक पातळीवर नावलौकिक मिळविलेला दौलताबाद किल्ला आहे. या शेजारीच H2O वॉटर पार्क आहे.एरव्ही हे वॉटर पार्क पर्यटकांनी गजबजलेले असते. परंतु मागील दिड वर्षापासून देशात कोरोनाचा संसर्ग पसरवत असल्याने राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे.
मध्यंतरी काही दिवस यात शिथिलता मिळाली असली तरी आता मात्र पुन्हा सर्वकाही ठप्प झाले आहे. यामुळे या वॉटर पार्कमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच पोटाची भूक भागविण्यासाठी येथील कर्मचारी सध्या मिळेल ते काम करत आहेत. या वॉटर पार्कमध्ये जवळपास ५० कर्मचारी काम करुन आपली उपजीविका भागवत होते. परंतु आता लॉकडाऊन मुळे संपूर्ण वॉटर पार्क बंद असल्याने आता केवळ ४ कर्मचारी या ठिकाणी कामाला येतात.
उर्वरित कर्मचारी मात्र मिळेल ते काम करुन आपली उपजीविका भागवत आहेत. कोरोना काळात सर्वच क्षेत्रात उपासमारीची वेळ अली आहे. तसेच मनोरंजन व्यवसाय गेल्या दोन वर्षांपासून ठप्प आहे. दरम्यान सर्वच मनोरंजन क्षेत्रातुन सरकारकडे मदत मागितली जात आहे.