जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडून नितीन गडकरींचं तोंड भरून कौतुक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

आज सांगलीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते संपन्न झाला. या सोहळ्यात सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्वच नेते एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे ही उपस्थित होते. यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांना केलेल्या कामाचे कौतुक केलं नाही तर प्रॉब्लेम होतो असा टोला लगावला. तसेच नितीन गडकरी यांनी केलेल्या कामाचे त्यांनी यावेळी तोंडभरून कौतुक केले.

सांगली जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने उभारलेल्या २ हजार ३३४ कोटी रुपये किमतीच्या ९६.७८ किमी लांबीच्या महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. यावेळी जयंत पाटील यांनी नितीन गडकरी यांचे कौतुक केले. सांगलीत रस्ते उत्तम प्रकारचे केले आहेत, वेगळ्या देशात आलो असे वाटते. आपण वेगवेगळ्या पक्षात असलो तरी आपण विकास कामासाठी कायम एकत्र येत असतो, असही जयंत पाटील म्हणाले.

खासदार संजयकाकांच्या खासदारकीच्या काळात नितीन गडकरी यांच्या माध्यमातून रस्ते चांगले झाले. चांगल्याला चांगले नाही म्हटले तर पडळकर जरा प्रॉब्लेम तयार होतात, अशी मिश्किल टिप्पणी करत संजयकाका आणि पडळकर वादाला त्यांनी पुन्हा वाट करून दिली. भारतामध्ये ज्याची गोष्टीचा गरज होती त्याच खात्याचे मंत्री गडकरी साहेब आहेत, असेही ते म्हणाले.

जिल्ह्यातल्या दुष्काळी भागातले रस्ते आज अतिशय सुंदर झाले आहेत. या रस्त्यावरून आम्ही सगळे जातो त्यावेळी आपण वेगळ्या प्रदेशात चाललो आहोत, वेगळ्या देशात आलोय असं वाटतं. एवढ्या उत्तम दर्जाचे रस्ते आपण केले. या देशामध्ये अनेक गोष्टीवर आपले मतभेद असतील, मात्र कामाच्या बाबतीत आपले मतभेद नाहीत.

अमेरिकेची प्रगती कशामुळे झाली? युरोप खंडाची प्रगति कशामुळे झाली? तर त्याचं सगळ्यात मूळ कारण तिथले रस्ते आणि रेल्वे. रस्ते या विषयात गडकरी साहेब यांनी अतिशय प्रभावीपणे काम केलं गडकरी साहेबांनी ज्या ज्या ठिकाणी हात घातला तिचं प्रकल्प पूर्ण झाले. आशा शब्दात त्यांनी गडकरी यांचे कौतुक केले. सांगलीमध्ये एकीकडे अहिल्यादेवी होळकर स्मारक उदघाटनावरून राष्ट्रवादी विरुद्ध भाजप वाद रंगला असताना दुसरीकडे नितीन गडकरी यांचे जयंत पाटील यांनी कौतुक केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

Leave a Comment