हॅलो महाराष्ट ऑनलाईन। (Water Sprinkler Fan) दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा असा काही वाढतोय की, घामाच्या नुसत्या धारा लागल्या आहेत. आता ऊन आहे म्हणून काही घराबाहेर पडणे टाळता येत नाही. काही ना काही कामासाठी उन्हामध्ये बाहेर पडावं लागत. उन्हाळ्यात आर्द्रतेमुळे मोठी समस्या होते. घरात चोवीस तास सुरु असणाऱ्या सामान्य कुलरचे पंखे आर्द्रतेमुळे कमजोर होतात आणि काम करणे बंद करतात.
मग उन्हाळ्यात जर कुलर काम करायचे बंद झाले तर काय होऊ शकत याचा विचार देखील करवत नाही. अशावेळी आर्द्रतेशी सामना करण्यासाठी बाजारात एक खास पंखा उपलब्ध झाला आहे. या पंख्याबद्दल जर तुम्हाला माहित नसेल तर मग ही बातमी तुमच्या कामाची आहे. चला तर जाणून घेऊया या आधुनिक फॅनविषयी अधिक माहिती.
वॉटर स्प्रिंकलर फॅन (Water Sprinkler Fan)
आद्रतेमुळे कुलरच्या पंख्याची पुरती वाट लागते. ज्यामुळे उष्णतेच्या वेळी आणखीच जीव निघतो. या समस्येवर पर्याय म्हणून बाजारात उपलब्ध असलेल्या नव्या पंख्याची सध्या चर्चा आहे. या पंख्याला ‘वॉटर स्प्रिंकलर फॅन’ असे म्हणतात. हा एक स्प्रिंकलर फॅन हवा आणि पाण्याचा स्प्रे अशा गोष्टींवर चालतो. यामुळे हा पंखा अगदी क्षणात तुम्हाला गारवा देतो. हा पंखा बऱ्यापैकी सोहळे, समारंभात वापरला जातो. कदाचित तुम्हीही हा पंखा एखाद्या लग्न समारंभ वा इतर कार्यक्रमात पाहिला असेल.
पाण्याच्या स्प्रेचा वापर
‘वॉटर स्प्रिंकलर फॅन’ हा अत्यंत प्रभावी असा कूलिंग फॅन आहे. (Water Sprinkler Fan) जो पाण्याचा शिडकावा करून गरम हवा थंड करतो. हा पंखा इनडोअर आणि आउटडोअर असा दोन्ही ठिकाणी चांगला परफॉर्म करतो. हा फॅन थेट पाण्याच्या नळाशी जोडलेला असतो. या पंख्याला लहान छिद्र असतात. त्यामुळे हा पंखा चालू केला असता तो पाण्याच्या शिडकावासोबत थंडगार वारा देतो.
USHA एरोलक्स नीब्ला मिस्ट पेडेस्टल फॅन
डिझाईन आणि सुविधेसोबत हा पंखा गरमीमध्ये थंडावा देणारा एक उत्तम पर्याय आहे. थंड पाण्याचा फवारा करत हा पंखा मस्त फिलिंग देतो. आसपासची उष्ण हवा काही वेळात बऱ्यापैकी थंड जातो. (Water Sprinkler Fan) या पंख्याची किंमत सुमारे १५ हजार रुपये इतकी आहे. या पंख्यासोबत, एक वेगळी ४१ लिटर पाण्याची टाकी मिळते. तसेच ९० वॅट क्षमतेमुळे तुम्हाला फार वीज देखील लागत नाही. मुख्य म्हणजे या पंख्याची कॉपर मोटर असल्यामुळे जास्त काळजी करण्याची गरज नाही.
कुठे खरेदी मिळेल?
हा नवा आधुनिक पंख तुम्हाला Amazon वर सहज उपलब्ध होईल. या ऑनलाईन शॉपिंग साईटवर HAVAI मिस्ट फॅन नावाने हा पंख विक्री केला जात आहे. जो एखाद्या कुलरच्या तुलनेने कमी जागा घेतो. तसेच पोर्टेबल असल्याने तो कुठेही नेणे सहज शक्य आहे. ऑनलाईन ऑर्डर केल्यावर या पंख्याची फास्ट डिलिव्हरी उपलब्ध आहे. (Water Sprinkler Fan) सोबत १ वर्षाची वॉरंटीदेखील मिळते.