औरंगाबाद: शहराला पाणीपुरवठा करणारी 1200 मिलिमीटर व्यासाची पाईपलाईन मंगळवारी(ता. आठ) रात्री चितेगाव जवळ फुटल्याने पाणी पुरवठा पुन्हा एकदा विस्कळीत झाला. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात 700 मिलिमीटर व्यासाची पाईपलाईन फुटली होती.1200 मिलिमीटर व्यासाच्या पाईपलाईन ची दुरुस्ती केली जात असली तरी नियोजित वेळेपेक्षा एक दिवस उशिराने नागरिकांना पाणी मिळणार आहे.
गेल्या आठवड्यात पैठण जवळील पिंपळवाडी येथे सातशे त्यात काल मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास पैठण रोडवरील चितेगाव टोल नाका जवळ नव्या शहराला पाणीपुरवठा करणारी मिलिमीटर व्यासाची पाईपलाईन फुटली. त्यामुळे जुन्या शहराचे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक एक दिवसाने पुढे ढकलण्यात आले. त्यात काल मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास पैठण रोडवरील चितेगाव टोलनाक्याजवळ नव्या शहराला पाणीपुरवठा करणारी 1200 मिलिमीटर व्यासाची पाईपलाईन फुटली.
हा प्रकार लक्षात येताच पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. यावेळी रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. त्यामुळे पाण्याचा प्रवाह तातडीने बंद करण्यात आला.त्यानंतर दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. बुधवारी(ता. नऊ) सायंकाळपर्यंत हे काम सुरू होते. काम पूर्ण झाल्यावर रात्री आठच्या सुमारास पाणीपुरवठा जायकवाडीहून सुरू केला जाईल असे कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी सांगितले. रात्री उशिरा शहरात पाणी पोचेल. त्यामुळे वेळापत्रक एक दिवसाने पुढे ढकलावे लागत आहे अशी माहिती धांडे यांनी दिली.