टरबूजाचा ट्रक उलटला; टरबूज लुटण्यासाठी लोकांची झुंबड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – कलिंगड घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने कलिंगडने भरलेला ट्रक धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाचोड जवळील डोमेगाव फाट्यावर रस्त्याच्या बाजूला पलटी झाल्याची घटना घडली आहे.

या विषयी अधिक माहीती अशी की, औरंगाबादहून बीडकडे कलिंगड घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाने ट्रकवरून अचानक नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला उलटल्याने त्यातील कलिंगड रस्त्यावर विखुरले गेले. या अपघातामध्ये ट्रकचालक जखमी झाला होता. पण त्याला मदत करण्याऐवजी महामार्गावर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी कलिंगड लुटायला सुरुवात केली. ही बातमी काही क्षणाताच परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांची तिथे एकच गर्दी झाली. ज्याला मिळेल तितकी आणि जमेल तितकी कलिंगड घेऊन लोकं तिथून पसार झाली.

काही जणांनी तर कलिंगड नेण्यासाठी मोठ-मोठ्या गोण्याही आणल्या होत्या. बघता-बघता सर्व कलिंगड घेऊन लोक गायब झाली. जखमी अवस्थेतही ट्रकचालक लोकांना विनवणी करत होता. पण लोकांनी ना त्याला मदत केली ना त्याच्या विनवणीकडे लक्ष दिले. लाखो रुपयांचे नुकसान झाल्यान ट्रक चालकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला आहे.

Leave a Comment