राष्ट्रवादीचे ९ आमदार भाजपच्या संपर्कात, रणजितसिंह निंबाळकरांचा दावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी । राज्यात सत्तास्थापनेचा पेच अजूनही कायम असतानाच राष्ट्रवादीचे ९ आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा माढ्याचे भाजपचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी केला आहे.

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पहाणी करण्यासाठी ते आज माढयात आले होते. त्यावेळी त्यांनी हा दावा केला आहे. त्याच्या दाव्यानंतर राज्यात घोडेबाजार सुरू होतो की काय अशीच शक्यता निर्माण झाली आहे. दोन दिवसापूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादीची भूमिका भाजपचे सात आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट केले होते.

अजित पवारांच्या या दाव्यावर आज खासदार निंबाळकरांचा विचारले असता भाजपचा एक आमदार पक्ष सोडून जाणार नाही उलट राष्ट्रवादीचे नऊ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Comment