आता पाळीव प्राण्यांशीही बोलता येणार; AI चा नवा कारनामा

man with pets
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात अनेकजण आपल्या घरात पाळीव प्राणी पाळतात. कुत्रा, मांजर, गाय, म्हैस अशी अनेक पाळीव प्राणी तुमच्याही घरात असेल. पाळीव प्राणी हा घरातील सदस्यासारखाच असतो ज्याची आपण भरपूर काळजी घेतो. परंतु कधी कधी तुमच्या घरातील कुत्रा किंवा मांजर दुखी असेल तर आपल्याला ते समजू शकत नाही… कारण त्यांना आपल्यासारखं बोलता येत नाही आणि आपण त्याच्यासारखं बोलू शकत नाही… यामुळे पाळीव प्राण्याच्या दुःख आणि वेदना समजणं, त्याच्यासोबत मनसोक्त वेळ घालवणं शक्य नसते. मात्र आता ही चिंता सुद्धा मिटणार आहे. AI च्या माध्यमातून आता पाळीव प्राण्यांशीही बोलता येणार आहे.

आर्टिफिशल इंटेलिजंस अर्थात AI च फॅड मागच्या काही दिवसात खूपच वाढलं आहे. AI मुळे जवळपास सर्वच क्षेत्रातील कामे सोप्पी बनली आहेत. AI मुळे माणसाला जास्त ताण घ्यावा लागत नाही. जर कोणतीही माहिती हवी असेल तर आपण AI चा करतोय. येत्या काळात AI संशोधन क्षेत्रातही खूप मोठी कमाल करेल असं बोललं जात आहे. आता तर एआयच्या मदतीने प्राण्यांच्या भावना समजून घेण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स (LSE) ने प्राण्यांचे शब्द समजून घेण्यासाठी एक विशेष केंद्र उघडले आहे. या केंद्राचे नाव जेरेमी कॉलर सेंटर फॉर अ‍ॅनिमल सेंटिअन्स असून ते ३० सप्टेंबर २०२५ पासून काम सुरू करेल.

मनुष्य आणि प्राणी यांच्यातील संबंध सखोलपणे समजून घेणे हाच या केंद्राचा मुख्य उद्देश आहे. यासाठी तब्बल ४२ कोटी रुपये खर्च केले आहेत. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की एआयच्या मदतीने पाळीव प्राण्यांशी बोलणे सोपे होईल. आगामी काळात, एआय ट्रान्सलेटर अॅप्सच्या मदतीने, तुमचा कुत्रा, मांजर किंवा कोणताही प्राणी काय अनुभवत आहे हे तुम्हाला कळेल. ज्या व्यक्तींना त्यांच्या पाळीव प्राण्यांशी बोलायचे आहे आणि त्यांच्या भावना समजून घ्यायच्या आहेत त्यांच्यासाठी हे फायद्याचे ठरेल. पाळीव प्राण्यांसोबतच शास्त्रज्ञ कीटक, खेकडे आणि कटलफिश सारख्या प्राण्यांवरही संशोधन करतील.

मात्र यामध्ये काही धोके सुद्धा आहेत. याबाबत प्राध्यापक जोनाथन बर्च म्हणतात की एआय आपल्याला आपल्याला आवडणारी माहिती देते. अशा परिस्थितीत, एआय कधीकधी खोटे बोलू शकते .. समजा एखादा पाळीव प्राणी दुखी आहे… परंतु एआय तो आनंदी आहे असेही सांगू शकते. यामुळे पाळीव प्राण्यांच्या काळजीवर परिणाम होऊ शकतो.