‘आम्ही पाणीपट्टी अर्ध्यावर आणली तुम्ही गॅसचे भाव अर्ध्यावर आणणार काय ?’; भाजपच्या बॅनरच्या शेजारी सेनेने लावले बॅनर

औरंगाबाद – मागील काही दिवसांपासून औरंगाबाद शहरात पाण्यावरून राजकारण तापले असतानाच आता याच पाण्यावरून शिवसेना-भाजपमध्ये बॅनर बाजी रंगल्याचे दिसून आले आहे.

 

शहरातील खडकेश्वर मंदिराच्या समोर भाजपने लावलेल्या जल आक्रोश मोर्चाचा बॅनरच्या शेजारीच शिवसेनेने देखील बॅनर लावून प्रत्युत्तर दिले आहे. ‘आम्ही पाणीपट्टी अर्ध्यावर आणली तुम्ही गॅसचे भाव अर्ध्यावर आणणार काय ?’ या आशयाचे बॅनर शिवसेनेच्यावतीने भाजपच्या बॅनरच्या बाजूला लावण्यात आले आहे. यावरून आता सेना-भाजपमध्ये बॅनर युद्ध सुरू असल्याचे दिसून येत आहे.

 

शिवसेनेने लावलेले हे बॅनर परिसरातील नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. आता शिवसेनेच्या या बॅनरला भाजप कसे उत्तर देईल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.