Tuesday, June 6, 2023

महेंद्रसिंग धोनीला आम्ही आजही मिस करतो, बसमधील त्याच्या जागेवर कुणीच बसत नाही..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महेंद्रसिंग धोनीने आपला शेवटचा एकदिवसीय सामना खेळला त्याला आता सहा महिन्यांतून अधिक काळ लोटला. विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध धोनी आपला शेवटचा सामना खेळला होता. या महिन्यातच महेंद्रसिंग धोनीला बीसीसीआयच्या वार्षिक करारातून वगळल्यामुळे धोनी आता निवृत्ती घेणार का? या चर्चांना बराच ऊत आला आहे.

un (6)

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीसुद्धा यंदाच्या आयपीएलमध्ये धोनीची कामगिरी कशी होते हे पाहणं रंजक राहील असं विधान केलं होतं. आयपीएलच्या कामगिरीवर धोनी ट्वेन्टी-ट्वेन्टी विश्वचषकात संघात समाविष्ट होऊ शकतो असंही शास्त्री पुढे म्हणाले. त्यामुळं धोनी आता काय निर्णय घेणार याकडं देशवासीयांचं लक्ष लागून राहीलं आहे.

un (8)

दरम्यान, भारताचा आघाडीचा लेगस्पिनर युझवेंद्र चहल याने भारतीय क्रिकेट टीम खेळायला जात असताना महेंद्रसिंग धोनी ज्या जागेवर बसतो ती जागा आजही रिकामी ठेवली जाते असं म्हणत धोनीच्या संघातील स्थानाचे संकेत दिले आहेत. ही जागा एका महान खेळाडूची असून इथे इतर कुणीच बसणार नाही असा अंगुलीनिर्देश करत युझवेंद्र चहलने ही माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहचवली आहे.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

हे पण वाचा-

ठरलं! IPL 2020 ची फायनल मुंबईतच, या दिवशी होणार अंतिम सामना

प्रसिद्ध बास्केटबॉलपटू कोबे ब्रायंटचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; कोबेच्या मुलीसह ९ प्रवाशी ठार

राज्यस्तरिय किशोर-किशोरी कबड्डी संघ निवड चाचणी; परभणीची उत्कृष्ठ कामगिरी