नैसर्गिक आपत्तींवर स्वतंत्र मंत्रालय हवे -देवेंद्र फडणवीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | भूस्खलन व नैसर्गिक आपत्ती हे सखोल संशोधनाचे विषय बनले असून, त्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली, स्वतंत्र मंत्रालयाचीही गरज असल्याची सूचना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पश्चिम घाटातील अतिवृष्टी आणि दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान कराड येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार जयकुमार गोरे, भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले आदी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्तीसह घटना घडत आहे. त्याचा अभ्यास करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू असते. काहीवेळी सरकार त्याबाबत अभ्यास गट नेमते. त्यांच्याकडून येणाऱ्या अहवालाकडे मात्र, गांभीर्याने पाहिले जात नाही. तेथे चूक होते. अशा अहवालाची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय असावे.

दोन वर्षांत राज्यावर तीनवेळा नैसर्गिक आपत्ती आली. यावरून आपत्तींचे प्रमाण वाढत चालल्याचे दिसत आहे असं फडणवीस म्हणाले. आपण मुख्यमंत्री असताना जागतिक बँकेच्या सहाय्याने धरणे, नद्यांचे पाणी कालव्याने दुष्काळी भागांना देण्याची योजना आखली होती. ही योजना पूर्ण होण्यास सात वर्षे लागली असती. मात्र, यापेक्षा दुसरा कोणताही पर्याय सद्याच्या स्थितीत दिसत नाही. असे फडणवीस यांनी म्हंटल

Leave a Comment