आम्ही स्वबळावरच लढणार; आता माघार नाही : नाना पटोलेंचा निर्धार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आगामी निवडणूका या एकत्रित न लढत त्या स्वबळाबर लढण्यावरून सध्या महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांमधून निर्धार व्यक्त केला जात आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तिन्ही पक्षातील नेनेत्यांकडून त्याची जोरदार तयारी केली जात आहे. या स्वबळाची नाऱ्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज जळगाव येथे निर्धार व्यक्त केला. आम्ही स्वबळावर लढणार असून आता कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही, असे पटोले यांनी म्हंटल आहे.

काँग्रेसचे प्रदेशाद्यक्ष नाना पटोले यांनी या पूर्वीही येणाऱ्या सर्व निवडणूक या स्वबळावरच लढणार आशयाचे म्हंटले होते. त्यानंतर त्यांनी आज पुन्हा पुनरुच्चार केला आहे. त्यांनी आज जळगाव येथे जाऊन कृषी कायद्यांविषयी केलेल्या आंदोलनास हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी कृषी कायद्यांविषयी प्रतीचे दहणही केले. यावेळी झालेल्या आंदोलनास आमदार प्रणिती शिंदे, अतुल लोंढे, आमदार शिरिष चौधरी, माजी खासदार उल्हास पाटील आणि काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी पटोले म्हणाले, सध्या महाविकास आघाडी सरकार आपले काम करीत आहे. निवडणुकांना अजून तीन वर्षे आहेत. अशा परिस्थितीत आघाडी सरकारमधील प्रत्येक पक्ष आपापली पक्ष संघटना वाढविण्यासाठी, मजबूत करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. काँग्रेसकडूनही आपली पक्ष संघटना वाढविण्याचे काम सुरु आहे. आम्ही आमच्या पक्षातील कार्यकर्त्यांना स्वबळाचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही.

Leave a Comment