Weather Forecast | महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसाळा सुरुवात झालेली आहे. त्याचप्रमाणे पुढील 48 तासात देखील अनेक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने कोकण, मराठवाडा या ठिकाणी पावसाचा येल्लो अलर्ट झाली करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे दक्षिण कोकणात देखील पुढील दोन दिवसात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. त्याचप्रमाणे उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील अनेक ठिकाणी मेघगर्जेनेसह पाऊस पडणार आहे.
मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात पावसाचा अंदाज | Weather Forecast
महाराष्ट्रातील पुढील 48 तासात मुंबई, पुणे, पालघर, कोकण आणि मराठवाड्यात देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या भागात पावसाचा येल्लो अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे राज्यातील विविध ठिकाणी मान्सून पूर्ण पावसाने देखील हजेरी लावलेली आहे. तसेच मुंबई आणि ठाण्यात देखील पाऊस पाहायला मिळणार आहे. सध्या राज्यामध्ये पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पाऊस लवकरच दाखल होणार आहे.
राज्यात अनेक जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट
आज महाराष्ट्रातील ठाणे, मुंबई, पालघर, रायगड या ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच जळगाव, धुळे, कोल्हापूर, नांदेड, लातूर , हिंगोली या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव या जिल्ह्यात पुढील 48 तासांसाठी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रात जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे. सध्या राज्यांमध्ये ऊन सावलीचा खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकीकडे पाऊस जरी पडत असला, तरी दुसरीकडे मात्र अनेक ठिकाणी उष्णता वाढलेली आहे. त्यामुळे लोकांना त्रास देखील होत आहे. शेतकऱ्यांच्या पिकाची देखील लागवड सुरू झालेली आहे. त्यामुळे शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.