Weather Update | राज्यावर अवकाळी पावसाचं संकट ! ‘या’ शहरांना दिला ऑरेंज अर्लट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Weather Update | मे महिना चालू झालेला आहे. आणि अशातच अवकाळी पावसाचे संकट आलेले आहे. गेल्या दोन दिवसापासून वादळी वर तसेच विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडत आहे. येणाऱ्या काही दिवसात देखील राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने वर्तवलेला आहे.

सकाळी ऊन तर दुपारनंतर अनेक ठिकाणी पाऊस होत आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये देखील अनेक ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पडत आहे. त्याचप्रमाणे गारपीट आणि सोसाट्याचा वारा देखील येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाटासह वादळ आणि गारपीटसह सूसाट्याचा वारा पडण्याची शक्यता आहे.

या शहरांना ऑरेंज अलर्ट | Weather Update

राज्यात अवकाळी पाऊस पडलेला आहे आणि हवामान खात्याने 12 ते 18 मेपर्यंत गारपिटीसह पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. अनेक जिल्ह्यांना येल्लो आणि ऑरेंज अलर्ट जाली केलेला आहे. मध्य महाराष्ट्रात नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये तर मराठवाड्यातील नांदेड, लातूर विदर्भामधील अकोला, अमरावती, नागपूर, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे. वादळीवारा देखील येणार असल्याने नागरिकांनी कामानिमित्त घराबाहेर पडावे असे देखील सांगण्यात आलेले आहे.

मुंबईत कसे असेल वातावरण

मुंबईतील वातावरणाचा अंदाज देखील हवामान विभागाने व्यक्त केलेले आहे. पुढील 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आकाश निरभ्र असेल, तर संध्याकाळपर्यंत ढगाळ वातावरण असल्याचे सांगितलेले आहे. या ठिकाणी तापमान 35°c पर्यंत असेल असे देखील सांगण्यात आलेले आहे.