Weather Update | जूनच्या शेवटच्या आठवड्यात कोसळणार मुसळधार पाऊस; मुंबईसाठी पुढील 2 दिवस महत्वाचे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Weather Update | मान्सूनला महाराष्ट्रात सुरुवात झाल्यानंतर काही काळ मान्सूनने विश्रांती घेतली होती. परंतु आता जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पाऊस पुन्हा एकदा मुंबईसह संपूर्ण राज्याभरात सक्रिय झालेला आहे. यावर्षी महाराष्ट्रात नेहमीपेक्षा लवकर पाऊस आला. परंतु मध्यंतरी पुन्हा एकदा पाऊस थांबला होता. परंतु आता मौसमी वाऱ्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याने पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे राज्यात बहुतांश ठिकाणी आता चांगला पाऊस पडत आहे. त्याचप्रमाणे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आता मान्सूनला (Weather Update) सुरुवात झालेली आहे. त्यामुळे राज्यातील विविध ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने (Weather Update) दिलेल्या माहितीनुसार पुढील चार आठवडे मान्सूनचा अंदाज देण्यात आलेला आहे. त्यामुळे बहुतांश ठिकाणी पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसात मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे मुंबई शहर, उपनगरसह पुणे जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने सतर्कतेचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या 24 आणि 25 जून रोजी मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईतील या भागांना यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे हवामान विभागाने सगळ्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना देखील शेतीची कामे करण्यासाठी हवाहन विभागाकडून इशारा आलेला आहे.