हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन (Weather Update Maharashtra) | गेल्या आठवड्यात जोरदार वारे आणि गडगडाटी वादळासह झालेल्या मान्सूनपूर्व पावसानंतर, आता मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यात पुढील ३ दिवस पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने याबाबत अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज म्हणजेच १३ मे रोजी मुंबईत जोरदार वाऱ्यासोबत (३०-४० किमी प्रतितास) पाऊस पडू शकतो. याबाबत शहरात यलो अर्लट जारी करण्यात आला आहे. तर ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी १३-१४ मे या दोन्ही दिवसांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोणकोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता ? Weather Update Maharashtra
मुंबईशिवाय, दक्षिण कोकणामध्येही पावसाचा ‘यलो ॲलर्ट’ देण्यात आला आहे. अहिल्यानगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांच्या घाट परिसरात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ‘ऑरेंज’ अलर्ट देण्यात आला आहे. पुणे शहराला मात्र येलो अलर्ट देण्यात आला आहे.
दुसरीकडे, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना सुद्धा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. इतर जिल्ह्यांमध्येही विजांसह हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. विदर्भातही वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असून अमरावती, वाशिम, भंडारा, बुलढाणा, अकोला, या जिल्ह्याना यलो अलर्ट देण्यात आला आहे. Weather Update Maharashtra
दरम्यान, यंदाचा मान्सून अपेक्षेपेक्षा आधीच सक्रिय झाला असून, २०२५ सालचा पावसाळा वेळेपेक्षा चार दिवस आधी केरळच्या किनाऱ्यावर दाखल होणार आहे. निकोबार बेटांपासून त्याला सुरुवात झाली आहे. गेल्या १७ वर्षांतील पहिल्यांदाच म्हणजेच २००८ नंतर, यंदा मान्सून नियोजित वेळेपेक्षा चार दिवस लवकर म्हणजे २७ मे २०२५ रोजी केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. सध्या मान्सून निकोबार बेटांवर, दक्षिण अंदमान समुद्रात आणि पूर्व बंगाल उपसागराच्या काही भागांत पोहोचलेला आहे. हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, महाराष्ट्रात मान्सून ६ जून २०२५ रोजी हजेरी लावेल, तर मुंबई आणि मध्य महाराष्ट्रात १० जून दरम्यान तो पोहोचण्याची शक्यता आहे




