Weather Update: महाराष्ट्रात गारपिटीसह अवकाळी पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अन येलो अलर्ट जारी

Weather Update
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Weather Update – गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने झोडपले आहे. या अचानक पडणाऱ्या पावसामुळे सर्व शेतकऱ्यांना चिंतेत टाकले आहे. या हवामानातील चढ उतारामुळे काही ठिकाणी उकाडा अन काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्यात अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. या अंदाजामुळे कोणत्या भागात कसे वातावरण असणार आहे , याची माहिती आज आपण घेणार आहोत.

गारपिटीसह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता (Weather Update) –

मध्य महाराष्ट्र, विदर्भ अन मराठवाड्यात गारपिटीसह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे या भागांमध्ये ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिक, बीड, अमरावती, चंद्रपूर, अहमदनगर, सातारा, पुणे, संभाजीनगर, जळगाव आणि जालन्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आले आहे.

या जिल्ह्यांना ढगाळ वातावरण –

राज्यातील इतर भागांमध्ये आज तापमानात वाढ (Weather Update) होण्याची शक्यता आहे. मुंबई शहर अन उपनगरात ढगाळ वातावरण राहण्याची आणि मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यात देखील अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

शेतकऱ्यांचे मोठे नुकसान –

या हवामानातील (Weather Update) बदलामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांचे काढलेली पिके खराब झाली आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांची काळजी घेणे आवश्यक आहे. हवामान खात्याने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, ते काढलेले पिक सुरक्षित ठिकाणी ठेवून अवकाळी पावसापासून त्याचे संरक्षण करावेत.