हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात सर्वत्र थंडी चालू असताना, पुन्हा एकदा वातावरणात मोठा बदल झालेला आहे. सर्वत्र आता ढगाळ वातावरण निर्माण झालेले आहे आणि हिवाळ्या जवळपास 11 जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वातावरणात मोठा बदल झाल्याने दुसरीकडे थंडी देखील गायब होताना दिसत आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार 28 डिसेंबर रोजी अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.
राज्यात अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी पडत होती. परंतु वातावरण बदलले आणि अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता बदलण्यात आलेली आहे. पुढील काही दिवस देखील पाऊसासाठी पोषक असे वातावरण असणार आहे. त्यामुळे 29 डिसेंबर पर्यंत उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
मुंबईमध्ये गेल्या दोन दिवसापासून सर्वत्र धुके पसरले होते. इतक्या मोठ्या प्रमाणात धुके होते की, 200 ते 300 मीटर अंतरावरील वाहने, इमारती देखील दिसत नव्हत्या. परंतु शनिवारी पहाटेपर्यंत पाऊस पूर्वेकडे सरकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. तसेच काही परिसरात गारपिटीसह पाऊस पडणार आहे. रविवारी विदर्भ मराठवाड्यातील काही तुरळक ठिकाणी देखील हवामान स्थिर राहणार आहे. तसेच सोमवारपासून पुन्हा एकदा थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. जर तुम्ही कोणतीही पिकांचे काम करत असाल, तर ते लवकरात लवकर करा. नाहीतर तुमचे नुकसान होण्याची शक्यता आहे. या अवकाळी पावसाचा परिणाम हरभरा, गहू तुर या पिकांवर होणार आहे