Weather Update | राज्यात सध्या अवकाळी पाऊस जरी पडत असला, तरी काही ठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणात उष्णता वाढलेली आहे. सोमवारपर्यंत उष्मा आणि आद्रतायुक्त वातावरण असणार असल्याचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिलेला आहे. मुंबईमध्ये शनिवारी तापमानाचा पारा 35°c होता. परंतु आद्रतेमुळे आणि सूर्यकिरण थेट जमिनीपर्यंत पोहोचत असल्याने वातावरणातील उष्णता वाढल्याने मुंबई करण्याचा जास्त त्रास झालेला आहे. त्याचप्रमाणे सोमवार पर्यंत कमाल तापमान हे 38°c पर्यंत जाण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे.
सांताक्रुज येते शनिवारी 34.9 सेल्फी असता कुलाबा येथे 34.4 अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झालेली आहे. सांताक्रुज येथील कमाल तापमान (Weather Update ) हे सरासरीपेक्षा 1.2 अंशांनी अधिक होते. त्याचप्रमाणे आद्रतेचे प्रमाण हे 70% च्या आसपास येते.
सोमवारी मतदान होणार आहे. मतदान होणाऱ्या अनेक जिल्ह्यांपैकी पालघरमधील डहाणू केंद्रावर शनिवारी 37° c, नागपूर शहर येथे 39 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले. तर डहाणू येथे तापमान हे सरासरी 2.8°c ने अधिक होते. या वातावरणामुळे नागरिकांना अधिक तहान लागते. त्याचप्रमाणे घामामुळे अस्वस्थता देखील निर्माण होते.
सोमवारी वातावरण कसे असेल ? | Weather Update
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मुंबईमध्ये सोमवारी तापमान हे 38 पर्यंत असू शकते. त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्यात 40 ते 41 अंशापर्यंत तापमान पोहोचण्याची शक्यता आहे. नाशिक येथे 41 दिंडोरी येथे 42 अंश असते. धुळे येथे 44° c पर्यंत तापमान असू शकते. या मतदारसंघांमध्ये किमान तापमानाचा पारा आहे. 27 ते 30° c पर्यंत असू शकतो. त्याचप्रमाणे उत्तर मुंबईमध्ये 35 ते 37°c, उत्तर पश्चिम मुंबई 34 ते 36 उत्तर पूर्व मुंबई 36 ते 38, उत्तर मध्यम मुंबई 34 ते 36 अंश सेल्सिअस एवढे तापमान असू शकते. त्याचप्रमाणे पालघर येथे 35 ते 38 अंश सेल्सिअस, भिवंडी येथे 39 ते 41°c, कल्याण येथे 39 ते 41°c, ठाणे येथे 38 ते 40°c पर्यंत तापमान असू शकते.
कोणती काळजी घ्यावी | Weather Update
- थेट सूर्यप्रकाशात जाणे टाळणे
- पुरेसे पाणी प्यावे
- तहान लागली नसली तरी पाणी प्यावे
- हलक्या रंगाचे सुती सैल कपडे परिधान करावे
- उन्हात फिरताना डोक्यावर ओला कपडा किंवा छत्री घ्यावी
- चक्कर येणे डोकेदुखी अति घाम ही लक्षणे उष्माघाताची आहेत.
- त्यामुळे लवकरच वैद्यकीय मदत देखील घ्यावी.