हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे कडाक्याच्या उन्हाने जीव हैराण झाला असताना आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात वादळी पाऊस (Weather Update Today) बरसू शकतो.. हवामान विभागाने याबाबत अंदाज वर्तवला असून यामुळे उन्हापासून काही प्रमाणात सुटका मिळणार आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात एखाद- दुसऱ्या दिवशी विजांचा गडगडाट, वाऱ्यासह किरकोळ पावसाची शक्यता आहे. विदर्भात हा प्रभाव जाणवू शकेल. तर काही भागात गारपीठ सुद्धा होऊ शकते. सध्या महाराष्ट्रात कमाल तापमान ३८ अंशापर्यंत आहे तर काही ठिकाणी ४० अंश सेल्सिअसपर्यंत आहे. शनिवारपासूनच्या आठवड्यात तापमान दोन अंश सेल्सिअसने खालावण्याची शक्यता आहे.
कुठे कुठे पाऊस पडणार ? Weather Update Today
दुसरीकडे, येत्या रविवारपासून मुंबईसह ठाणे पालघर आणि भागात पाऊस पडण्याची शक्यता हवमान विभागाने वर्तविली आहे. मुंबई आणि ठाणे परिसरात गडगडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर, पालघर भागात हलक्या सरींचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तर संपूर्ण कोकण, उत्तर महाराष्ट्र, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, नांदेड, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अमरावती या जिल्ह्यांत ३ ते १० मेपर्यंतच्या आठवड्यात ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामान विभागाने (Weather Update Today) वर्तवला आहे.
ईशान्य राजस्थानात समुद्र सपाटीपासून 1.5 ते 3.1 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. पंजाबपासून राजस्थान, मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक ते उत्तर केरळपर्यंत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. राजस्थानमधील जैसलमेर येथे देशातील उच्चांकी 46.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.