हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Weight Gain Food) हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात बरेच वेळा आपले आपल्या खाण्या पिण्याकडे दुर्लक्ष करतो. परिणामी अशक्तपणा येतो आणि चिडचिडा स्वभाव होतो. जो आपल्या चेहऱ्यावर आणि शरीरावर दिसून येतो. याचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर होतो. आत्ताच्या स्पर्धात्मक युगात व्यक्तिमत्वाला फार महत्व असते. अशा वेळी शरीराला सुदृढ आणि त्वचा तेजस्वी असेल तर साहजिक चारचौघात तुम्ही उठून दिसता. मात्र अनेक लोकांचे कमी वजन त्यांच्या न्यूनगंडाचे कारण होते.
मुख्य म्हणजे, खूप प्रयत्न करूनही वजन वाढत नाही. त्यामुळे आणखीच नकारात्मक वाटू लागते. अशावेळी तुम्हाला जंक फूड खाणे हा पर्याय सोपा वाटू शकतो. पण याऐवजी तुम्ही चांगला आणि सकस आहार घेऊन देखील वजन वाढवू शकता. (Weight Gain Food) यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात काही महत्वाच्या घटकांचा समावेश करणे गरजेचे आहे. वजन वाढविण्यासाठी तुम्ही कॅल्शिअम, प्रोटीन यांसारखे पोषक तत्व आपल्या आहारात समाविष्ट करू शकता. यासाठी कोणते पदार्थ कसे फायदा देतात? ते जाणून घेऊया.
स्नायूंच्या वाढीसाठी
प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट्स यासारखे घटक असलेले अन्न खाल्ल्याने शरीराच्या स्नायूंची वाढ होण्यास मदत होते. (Weight Gain Food) वजन वाढवण्यासाठी दूध, दही, पनीर, लोणी याबरोबरच अन्य दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करावा. यामध्ये असलेल्या प्रोटीन आणि कॅल्शिअम मुले हाड मजबूत होतात आणि शरीराचे वजन वाढते आणि आरोग्यही उत्तम राहील.
शारीरिक तंदुरुस्तीसाठी
सुक्या मेव्यामध्ये पूरक पोषकतत्वे असल्यामुळे शरीर तंदुरुस्त राहते. (Weight Gain Food) त्यामुळे काजू, बदाम, बेदाणे, खजूर, खारीक यासारखे पदार्थ रोजच्या आहारात असावेत. सुक्या मेव्यामध्ये कॅलरी, अँटीऑक्सिडंट आणि अन्य पोषकतत्त्वं असतात. त्यामुळे आपली छोटी भूक देखील शांत होते.
ताजेतवाने होण्यासाठी
वजन वाढवण्यासाठी पीनट बटर हा देखील एक चविष्ठ उपाय आहे. यामधील फॅट आणि कॅलरीज मुले शरीराचे वजन वेगाने वाढते. यासोबत च आळशीच्या बिया, भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया यामुळे देखील शरीराला ताकद मिळते. अशा पदार्थांचा नियमित आहारात समावेश करावा.
निरोगी जीवनशैलीसाठी (Weight Gain Food)
नियमित फळे खाल्ल्याने शरीर निरोगी बनते. पपई, सिताफळ, केळं, चिकू, आणि अंजीर यासारख्या फळांमध्ये मोठ्या प्रमाणावर पोषक तत्त्वं असतात. हि फळे अशीच कापून खावीत किंवा त्याचा दूध घालून शेक बनवून पिऊ शकता. यामुळे काही आठवड्यांतच तुमचं शरीर निरोगी होईल व तंदुरुस्त दिसेल.
अशक्तपणा होईल दूर
नियमित फळांसोबत भाज्यांचं सेवनसुद्धा तितकेच गरजेचे आहे. वजन वाढवण्यासाठी बटाटा, रताळं, मका, छोले आणि शेंगा आहारात खाल्ल्यास आवश्यक पोषक तत्त्वं मिळतात आणि अशक्तपणा दूर होतो. तुमच्या आहारात जितक्या भाज्या जास्त असतील तितके तुमच्या शरीराला त्याचा फायदा होईल व तुम्ही निरोगी दिसाल.
डॉक्टरांचा सल्ला
वरील सर्व उपाय करून देखील वजन वाढत नसेल आणि शरीरात अशक्तपणा जाणवत असेल तर अशा वेळ डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार सुरू केले पाहिजेत. (Weight Gain Food)