Commonwealth Game 2022: मराठमोळ्या संकेतने जिंकले रौप्यपदक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरु राष्ट्रकुल स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारताने पहिलं पदक मिळवलं आहे. सांगलीचा सुपुत्र संकेत महादेव सरगर या मराठमोळ्या खेळाडूने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक मिळवून इतिहास घडवला आहे. संकेतने 55 किलो वजनी गटात एकूण 248 किलोग्राम वजन उचलत ही कामगिरी केली आहे.

संकेत सरगरने दोन फेऱ्यांच्या 6 प्रयत्नांत पूर्ण ताकद पणाला लावली आणि एकूण 228 किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकले. त्याने पहिल्याच प्रयत्नात 107 किलो वजन उचलले. त्याचवेळी दुसऱ्या प्रयत्नात त्याने अधिक जोर लावत 111 किलो वजन उचलले. यासोबतच त्याचा तिसरा प्रयत्नही खूप यशस्वी ठरला आणि यामध्ये त्याने 112 किलो वजन यशस्वीपणे पेलले.

दुसऱ्या प्रयत्नात संकेतने 139 किलोग्राम वजन उचलण्याचा प्रयत्न केला. पण त्यात तो अयशस्वी झाला. तेव्हाच त्याच्या हातालाही दुखापत झाली. तिसऱ्या प्रयत्नात 139 किलो वजन उचलण्याचा त्याने प्रयत्न केला पण दुखापतीमुळे तो अयशस्वी ठरला. ज्यामुळे अखेर त्याचा स्कोर 248 किलोग्राम इतकाच राहिला.

कोण आहे संकेत सरगर-

संकेत सरगर हा मूळचा सांगली जिल्यातील आहे. त्याचे वडील साधी पानाची टपरी चालवतात. हलाखीच्या परिस्थिती असूनही संकेतने फक्त आपल्या अथक प्रयत्नांच्या जोरावर एक मोठं यश मिळवलं आहे. सध्या देशभर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.