हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Weird Food Fusion) आजपर्यंत तुम्ही सोशल मीडियावर अनेक फूड फ्युजनचे व्हिडीओ पाहिले असतील. यातील बरेच व्हिडीओ तुम्हाला आवडले असतील तर काही व्हिडीओ डोक्यात गेले असतील. जगभरात ठीक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे खाद्यपदार्थ बनवून खाल्ले जातात. तसा आपल्या देशाला खाद्य संस्कृतीचा एक वेगळा वारसा लाभलेला आहे. मात्र, आजकाल फूड फ्युजनचा एक वेगळाच ट्रेंड सुरू आहे. त्यामुळे कशात काय घालून खातील याचा काहीच नेम नाही. जगभरातील फुडी लोक आवडीने सामोसा खातात. पण सोशल मीडियावरील हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही पुन्हा समोसा खायचा का नाही? असा विचार कराल.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एका ठेल्यावर सामोस्याचा एक वेगळाच प्रकार विकला जातोय. सामोस्यात खास करून बटाट्याची आणि हिरव्या वाटाण्याची भाजी असते. (Weird Food Fusion)ज्यामुळे एक सामोस्याला एक वेगळा फ्लेवर येतो. ही भाजी म्हणजे समोस्याचा जीव. पण, सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही असं म्हणू शकता की, या विक्रेत्याने सामोसातला जीवच काढून टाकलाय. कारण, बटाट्याऐवजी त्याने या सामोस्यात भेंडीची भाजी भरली आहे.
होय. तुम्ही अगदी बरोबर वाचताय. या विक्रेत्याने सामोस्यामध्ये भेंडीची भाजी भरली आहे. अनेक लोकांना भेंडीची भाजी खायला आवडत नाही. पण, या विक्रेत्याने तर कहरच केलाय. थेट सामोशाच्या आतमध्ये भेंडीची भाजी भरली आहे. तर, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक खवय्ये लोकांनी मात्र संताप व्यक्त केला आहे. (Weird Food Fusion)बऱ्याच लोकांनी ‘या विक्रेत्याने तर सामोस्याची वाट लावली’, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर काहींनी ‘हा भेंडी सामोसा कोण विकतय रे?’ अशी विचारणा केली आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया (Weird Food Fusion)
सोशल मीडिया इंस्टाग्रामवर Food_ish नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावरील बऱ्याच नेटकर्यांनी पाहिला आहे. नुसता पाहिला नाही तर अनेकांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर विक्रेत्यावर संताप व्यक्त केला आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणारा भेंडी सामोसाचा व्हिडीओ पाहून एक मोठी संतापाची लाट उसळली आहे.
एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये लिहिले आहे की, ‘या माणसाने तर मूड खराब केला’. तसेच आणखी एकाने लिहिले की, ‘हा माणूस नरकाचा मार्ग मोकळा करतोय जरा तरी भीती बाळग रे’. तर आणखी एकाने लिहिले, ‘याने तर माझ्या लाडक्या सामोसाची वाट लावली’. (Weird Food Fusion)