हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Weird Foods) जगभरात ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ले जातात. एखादा पदार्थ बनवण्याची प्रत्येकाची पद्धत आणि चवी वेगवेगळ्या असू शकतात. पण जगभरात काही अशी ठिकाण आहेत जिथे काही पदार्थ अत्यंत विचित्र आणि विक्षिप्त स्वरूपातील असतात. ज्याबद्दल आपण कधी विचारही केला नसेल असे बुद्धिबाहेरचे पदार्थ बरेच लोक खातात. यामध्ये चिनी लोकांसोबत कॉम्पिटिशन करणे अवघड आहे. संपूर्ण जगात चिनी लोक विचित्र पदार्थ खाण्यासाठी प्रसिद्ध आहे. पण केवळ चायना नव्हे तर आणखी काही देशांमध्ये असेच विचित्र पदार्थ खाल्ले जातात.
हे पदार्थ असे आहेत जे पाहून तुम्ही टेस्ट करण्याचीसुद्धा हिंमत करू शकणार नाही. इतकंच काय तर हे पदार्थ (Weird Foods) पाहून तुमची जेवणावरून इच्छा उडून जाईल. अंगावर काटा येईल आणि तुम्ही डोळे मिटून घ्याल. मात्र, जगातील काही ठिकाणी हेच पदार्थ अत्यंत चवीने आणि आवडीने फस्त केले जातात. अशा या पदार्थांविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. चला तर पाहुयात हे पदार्थ कोणते आहेत?
1. स्टिंक हेड्स

वर फोटोत दिसणाऱ्या या पदार्थाचे नाव ‘स्टिंक हेड्स’ असे आहे. (Weird Foods) हा पदार्थ किंग सॅल्मन नावाच्या माशापासून तयार केला जातो. खास करून अलास्कामध्ये हा पदार्थ खवय्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. हा पदार्थ मूळ अलास्का संस्कृतीतील एक पारंपारिक डिश म्हणून ओळखला जातो. यामध्ये किंग सॅल्मनचे माशाचे डोके जमिनीवर किंवा कंटेनरमध्ये ठेवून आंबवले जाते.
2. कोब्रा हार्ट

होय. तुम्ही अगदी बरोबर समजले आहात. कोब्रा सापाविषयीच आपण बोलतोय. (Weird Foods) या सापाचं नुसतं नाव काढलं तरी अनेकांच्या अंगावर काटा येतो. पण व्हिएतनाममध्ये मात्र या कोब्रा सापाचं काळीज चवीने खाल्लं जातं. या ठिकाणी बऱ्याच हॉटेलमध्ये ग्राहकांसमोरच कोब्रा साप फाडून त्याचं काळीज प्लेटमध्ये सर्व्ह केलं जात. त्यानंतर वेगवेगळ्या सॉस आणि चटणीसोबत अनेक खवय्ये कोब्रा सापाचं काळीज खातात.
3. सन्नाकजी (Weird Foods)

या फोटोत दिसणाऱ्या पदार्थाचे नाव ‘सन्नाकजी’ असे आहे. ही कोरियाई डिश असून यामध्ये ८ पायाचा ऑक्टोपस कापून खाल्ला जातो. हा पदार्थ लांब हाताच्या ऑक्टोपसपासून बनवतात. हे ऑक्टोपस समुद्रातून पकडून आणतात आणि त्यानंतर जिवंत कापून हा पदार्थ बनवून विकला जातो. कोरिया मध्ये खास करून हा पदार्थ स्ट्रीट फूड म्हणून प्रसिद्ध आहे.
4. जूमील्स

या फोटोतील पदार्थाचे नाव ‘जूमील्स’ असे आहे. ही डिश मेक्सिकोमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. ज्युमिल्स हा लहान दुर्गंधीयुक्त किडा आहे. ज्याला ६ पाय असतात. मेक्सिकोतील ग्युरेरो राज्यातील टॅक्सको प्रदेशात हा किडा मोठ्या आवडीने खाल्ला जातो. ऑक्टोबर ते जानेवारी दरम्यान हे किडे सर्वाधिक गोळा केले जातात.
(Weird Foods) गरम सॉस, बीन्ससोबत कॉर्न टॉर्टिला टॅकोमध्ये हे किडे जिवंत टाकून खाल्ले जातात. याशिवाय भाजून, टोस्ट करून किंवा तळून त्यावर लिंबाचा रस, मीठ, पीठ मिरची, अजमोदा (ओवा) आणि कांदा टाकून स्ट्रीट फूड म्हणून याची विक्री करतात. या किड्यामध्ये मिठाचे प्रमाण फार जास्त असते.
5. गॉडझिला रामेन

या पदार्थाचे नाव ‘गॉडझिला रामेन’ असे आहे. हा पदार्थ मगरीच्या पायापासून बनवला जातो. हे एकप्रकारचे सूप आहे. ज्यामध्ये मगरीचे पाय, मगरीची अंडी, डुकराचे मांस, बेबी कॉर्न, वाळलेल्या बांबूचे कोंब, काळी बुरशी आणि फिश पेस्टचे चौकोनी तुकडे घातले जातात. हे सूप तैवानमध्ये खवय्ये मोठ्या आवडीने खातात. (Weird Foods)




