Weird Place : काय सांगता? पृथ्वीवरही आहे ‘पाताळलोक’; सपाट जमिनीच्या गर्भात राहतात हजारो लोक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Weird Place) आज पर्यंत तुम्ही स्वर्ग, नरक, इंद्रलोक, यमलोक, पाताळ लोक याविषयी विविध गोष्टी ऐकल्या असतील. अनेक पौराणिक कथा, ग्रंथ यांमध्ये या लोकांविषयी माहिती दिलेली आहे. तसेच पौराणिक कथांवर आधारलेल्या मालिका आणि चित्रपटांमध्ये देखील स्वर्ग, नरक आणि पाताळ लोक दाखवले जाते. यातील पाताळ लोक अत्यंत भयानक दाखवलेले असते. ते अस्तित्वात आहे का? याविषयी अनेकांना कायम प्रश्न पडतो. अशातच आज आपण पृथ्वीवरील एका अशा ठिकाणाची माहिती घेणार आहोत ज्याची ओळख ‘पाताळलोक’ अशीच आहे. हे ठिकाण पाहिल्यानंतर कुणालाही एका दुसऱ्या जगात प्रवेश केल्याची प्रचिती येऊ शकते. चला तर जाणून घेऊया या रहस्यमय ठिकाणाविषयी अधिक माहिती.

पृथ्वीवरील ‘पाताळलोक’ (Weird Place)

ज्या पृथ्वीवर आपण राहतो त्या पृथ्वीवर ‘पाताळलोक’ अस्तित्वात आहे हे ऐकूनच अनेकांना धक्का बसला असेल. मात्र, खरोखरच पृथ्वीवर एक असं ठिकाण आहे ज्याचा मूळ जमिनीवरील भाग अत्यंत सपाट दिसत असला तरीही भूगर्भात अनेक लोक गेल्या कित्येक वर्षांपासून राहत आहेत. येथे बहुतेक घरांची बांधणी ही जमिनीखाली करण्यात आली आहे. अत्यंत पारंपरिक पद्धतीने बांधलेली ही घरे वर्षानुवर्षे आहे तशीच आहेत. काही संशोधकांनी यावर अभ्यास केला असता त्यांच्या हाती लागलेल्या पुराव्यानुसार त्यांनी काही महत्वाची माहिती प्रदान केली आहे.

७ हजार वर्षांपूर्वीची घरं

संशॊधकांच्या हाती लागलेल्या ऐतिहासिक पुराव्यांनुसार असे समोर आले आहे की, ही घरे सुमारे ७००० वर्षांपूर्वी बांधली आहेत. या ठिकाणी राहणारी काही कुटुंब आजही अशी घरे बांधतात. (Weird Place) ज्यासाठी भूगर्भात मोठमोठे खड्डे केले जातात. या घाणीची बांधणी त्या काळात नैसर्गिक परिस्थितीला सामोरं जाण्याच्या विचारातून करण्यात आली होती. पृष्ठभागावर तापमान वाढलं की ही घरं आतून थंडावा देत आणि थंडीत उष्णता देण्याचे काम करत.

पिवळ्या मऊ मातीचे मजबूत पठार

या ठिकाणाला लॉस पठार म्हणून ओळखले जाते. मुख्य म्हणजे इथली माती पिवळी आणि अतिशय मऊ आहे. त्यामुळे या ठिकाणी खोदकाम करणे सोपे जाते. (Weird Place) तसेच हे पठार अत्यंत मजबूत असल्यामुळे याठिकाणी बांधलेली घरं कोणत्याही आधाराशिवाय उभी आहेत. घरांसाठी विटा, फरशा वापरण्याची गरज पडत नाही. या पठारावरील घरं दगड, माती आणि बांबूपासून बनवलेली आहेत. तसेच याठिकाणी एकही इमारत नाही.

कुठे आहे हे अजब ठिकाण?

पृथ्वीवरील ‘पाताळलोक’ म्हणून ओळख असलेलं हे गजब ठिकाण उत्तर चीनमध्ये आहे. उत्तर चीनच्या लॉस पठारावर बेयिंग नावाचे गाव आहे. या ठिकाणी बांधलेल्या घरांना ‘डिकेंग युआन’ नावाने ओळखले जाते. याचा अर्थ खड्डा असलेले अंगण असा आहे. चीनमधली ही एकमेव गुहेची निवासस्थाने नाहीत. तर चीनमध्ये शांक्सी प्रांतातील यानानची गुहादेखील अनेक शतके जुनी आहे. ज्या ठिकाणी माओ झेडोंग आणि त्यांच्या राजकीय साथीदारांच्या राहण्यासाठी घरे बांधण्यात आली होती. (Weird Place)