हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Weird Tradition) देशभरात विविध ठिकाणी विविध जाती आणि धर्माचे लोक वास्तव्यास आहेत. त्यामुळे ज्या त्या ठिकाणी त्या त्या जातींच्या परंपरा आणि सण साजरे केले जातात. अनेक ठिकाणी देव देवतांचे सण आणि उत्सव मोठ्या जल्लोषात साजरे केले जातात. काही ठिकाणी देवाला प्रसन्न करण्यासाठी कोंबडा किंवा बकरा बळी दिला जातो. तर काही ठिकाणी देवाला खुश करण्यासाठी पाळल्या जाणाऱ्या परंपरा अत्यंत भयंकर स्वरूपाच्या असतात. मनात देवाविषयी भाव भक्ती असेल तर देव आपल्या भक्तांच्या हाकेला धावतो असे म्हणतात. मात्र, काही भाविक अंधश्रद्धेमूळे चुकीच्या प्रथांना चालना देताना दिसतात.
सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ व्हायरल होतोय जो पाहून तुमच्या अंगावर काटा उभा राहील. अगदी तोंडावर होळीचा सण असताना हा व्हिडिओ व्हायरल होतोहा. संपूर्ण देशभरात विविध ठिकाणी विविध पद्धतीने होळी हा सण साजरा केला जातो. या दिवशी लाकूड, झाडाची सुकलेली पाने आणि शेणाच्या गोवऱ्या सर्व एकत्र उभारून त्यांचे दहन केले जाते. ज्याला ‘होलिका दहन’ म्हणतात. (Weird Tradition) असाच होळी साजरा करतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. मात्र, यामध्ये आनंद नव्हे तर भयावह चित्र दिसून आले आहे. हा व्हिडिओ केरळमधील असल्याचे समोर आले आहे. जो पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, समोर होलिका दहन सुरू आहे. लाकडाने चांगलाच पेट घेतला आहे आणि यामध्ये काही माणसं धावत जात आहेत. होय. आगीच्या भयंकर ज्वालांमध्ये काही व्यक्ती धावत जाताना दिसत आहेत. (Weird Tradition) ही प्रथा अत्यंत भयंकर आणि तितकीच अघोरी असल्याचे अनेक नेटकरी म्हणताना दिसत आहेत. होळी हा सण नकारात्मक शक्तींचा नायनाट होऊन सुख, शांती यावी म्हणून साजरा केला जातो. मात्र, केरळमधील या गावात सुख, शांती, भरभराट येण्यासाठी ही लगोरी प्रथा पाळली जात असल्याचे गावकरी सांगतात.
अग्निकुंड ओलांडण्याची प्रथा (Weird Tradition)
या व्हायरल व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये या प्रथेबाबत माहिती देण्यात आली आहे. ज्यात लिहिलंय, ‘भारतातील केरळमध्ये श्री राजा राजेश्वरी मंदिरात हा विधी केला जातो. मंदिर परिसरातील अग्निमध्ये चालण्याचा हा सोहळा आहे. ही एक हिंदू धार्मिक प्रथा आहे. जिथे देवी द्रौपदीने दिलेल्या इच्छा किंवा आशीर्वादाच्या बदल्यात भक्त अग्निकुंड ओलांडून जातात’. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला असून अनेकांनी या प्रथेला ‘अघोरी’ म्हटले आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडिया इंस्टाग्राम हॅण्डल bizarre_doctor नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ अनेक लोकांनी पाहिला असून काही नेटकऱ्यांनी ही दृश्य विचलित करणारी असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी या प्रथेला अघोरी म्हणत याबाबत आक्षेप घेतला आहे. (Weird Tradition)