बरे, बाधित बरोबरीत : सातारा जिल्ह्यात नवे 804 पाॅझिटीव्ह, तर 873 कोरोनामुक्त

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यात मंगळवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये केवळ 804 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 873 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 10 हजार 379 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 93 हजार 367 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 79 हजार 904 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 4 हजार 366 बाधितांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी दिवसभरात 21 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. गेल्या चोवीस तासात 10 हजार 687 जणांचे नमुने घेण्यात आले.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर सोमवार अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसात
जावली 37 (8542), कराड 286 (27503), खंडाळा 18 (11757), खटाव 51 (19508), कोरेगांव 61(16751), माण 29(13159), महाबळेश्वर 3(4278), पाटण 39(8432), फलटण 32 (28351), सातारा 167 (40308), वाई 44 (12649) व इतर 13 (1325) असे आज अखेर एकूण 192563 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.