सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडेचा राष्ट्रवादीत प्रवेश; बॉलिवूडनंतर आता राजकारणात लावणार सूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महाराष्ट्राची अत्यंत लोकप्रिय आणि बॉलिवूड जगतातील आघाडीची गायिका वैशाली माडे हिने एक नवी जबाबदारी खांद्यावर घेतली आहे. तिने नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे, असे वृत्त समोर येत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत तीने राष्ट्रवादीचे घड्याळ हाती घेतले आहे. त्यामुळे निश्चितच आता वैशाली बॉलिवूड नंतर राजकारणात सूर लावण्यासाठी सज्ज आहे. तिच्या प्रवेशानंतर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी वैशालीचे स्वागत केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री धनंजय मुंडेंनीही ट्विट करुन तिचे पक्षात स्वागत केले आहे. आता हे पाहणे अत्यंत उत्सुकतेचे आहे कि वैशालीच्या हा राष्ट्रवादीतील प्रवेश सूर लावण्यासाठी आहे का सुरुंग..

मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयात खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित ३१ मार्च २०२१ रोजी गायिका वैशाली माडेचा पक्ष प्रवेश होणार असल्याचे यापूर्वी ठरले होते आणि अशी घोषणाही त्यांनी केली होती. मात्र, कोरोना महामारीचे संकट वाढल्यामुळे हा पक्षप्रवेश तेव्हा करणे अशक्य होते म्हणून हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. त्यानंतर, आज वैशालीने अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व स्विकारले आहे. यावेळी, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडेंसह राष्ट्रवादीचे इतर मुख्य नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

वैशाली माडे ही विदर्भातील मूळ हिंगणाघाट येथील शेतकरी कुटुंबातून आहे. तिने हिंदी व मराठी भाषेतील अनेक चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केले आहे. ‘बाजीराव मस्तानी’ या हिंदी चित्रपटातील ‘पिंगा’ हे तिने गायलेल्या गाण्यांपैकी एक प्रचंड गाजलेले गाणे आहे.

या गाण्यासाठी तिला अनेक पुरस्कारांनीदेखील गौरवण्यात आले आहे. तसेच तिने ‘कलंक’ या हिंदी चित्रपटातील ‘घर मोरे परदेसिया’ हे ही गाणे तोडीचे गेले आहे. मराठी चित्रपटांतही तिने अनेक अव्वल गाणी गायली आहेत. वैशाली मराठी व हिंदी दोन्ही ‘सारेगमप’ महासंग्रामांची विजेती आहे. दरम्यान, वैशाली ‘मराठी बिग बॉस’च्या दुसऱ्या पर्वात स्पर्धक म्हणून देखील सहभागी झाली होती.

Leave a Comment