व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

एकतर्फी प्रेमातून वेड्या झालेल्या तरुणाने उचलले ‘हे’ पाऊल

जयपूर : वृत्तसंस्था – अजमेरमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. यामध्ये घराच्या शेजारी राहणाऱ्या महिलेसोबत असलेल्या एकतर्फी प्रेमातुन आरोपी तरुणाने धक्कादायक पाऊल उचलत या महिलेच्या मुलाचे बोट दाताने तोडून वेगळं केलं. या आरोपी तरुण शेजारी राहणाऱ्या महिलेसोबत पळून जाऊन संबंध ठेवू इच्छित होता. घटनेच्या दिवशी या आरोपी तरुणाचे व या महिलेचे भांडण झाले.

यानंतर या आरोपी तरुणाने महिलेच्या 12 वर्षीय मुलाच्या हाताचं बोट दाताने तोडून वेगळं केलं. यानंतर पीडित महिलेने या प्रकरणी क्लॉक टॉवर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. शेजारी राहणारा 30 वर्षीय रोहित नावाची व्यक्ती बऱ्याच काळापासून त्याच्यासोबत अवैध संबंध ठेवण्यासाठी दबाव आणत होता. यानंतर आरोपी रोहितने घटनेच्या दिवशी घरात घुसून या महिलेला मारहाण केली. तसेच तो तिच्या गळ्यातील मंगळसूत्र घेऊन फरार झाला.

यादरम्यान आरोपी रोहितने या महिलेच्या मुलालादेखील मारहाण केली. याशिवाय त्या मुलाच्या हाताचे बोट आपल्या दाताने तोडून वेगळं केलं. यानंतर पीडितेने पोलिसात तक्रार दाखल केली. या महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरु केला आहे.