व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

हॉटेलच्या रूममध्ये गर्लफ्रेंडसोबत गेला अन् काही दिवसांनी पॉर्न साइटवर व्हिडिओ पाहताच….

बेंगळुरू । कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथून सायबर गुन्ह्याची एक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे की, त्याच्या गर्लफ्रेंडसोबतच्या हॉटेल रूम मधील व्हिडिओ पॉर्न साइटवर अपलोड करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

अशोक नगर येथील एका 25 वर्षीय बीपीओ कर्मचाऱ्याने 24 जानेवारी रोजी सेंट्रल सायबर इकॉनॉमिक्स आणि नार्कोटिक्स पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. आपल्या नकळत आपला खासगी व्हिडिओ शूट करून वेबसाइटवर अपलोड केल्याचे या तरुणाचे म्हणणे आहे. फिर्यादीने पोलिसांना सांगितले की,”हा व्हिडिओ त्या हॉटेलच्या खोलीतला आहे जिथे तो काही दिवसांपूर्वी त्याच्या मैत्रिणीसोबत राहिला होता.”

याप्रकरणी पोलिसांनी हॉटेल कर्मचाऱ्यांची चौकशी केली. मात्र, हा व्हिडीओ त्या तरुणाने स्वत: किंवा त्याच्या मैत्रिणीने कि इतर कोणी शूट केला हे अद्याप समजू शकलेले नाही. वृत्तानुसार, पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, “सदर व्हिडिओ वेगवेगळ्या कोनातून घेण्यात आला आहे आणि प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की त्यासाठी कोणताही गुप्त कॅमेरा वापरला गेलेला नाही.”

अपलोड केलेल्या या व्हिडीओमध्ये त्याचा आणि त्याच्या मैत्रिणीचा चेहरा अस्पष्ट असल्याचे फिर्यादीने म्हटले आहे, मात्र त्याने आपल्या छातीवरील जन्मखूणावरून तो ओळखला. पॉर्न साइटवर व्हिडिओ आल्यानंतर तक्रारदाराने पोलिसांना सांगितले की,” तो इतर काही साइटवर देखील उपलब्ध आहे.”