West Bangal | आपला भारत देश स्वतंत्र होऊन आता कित्येक वर्ष उलटलेली आहे. इंग्रजांचे आपल्या देशावरील राज्य संपले आणि आपला देश स्वतंत्र झाला. त्यानंतर आपल्या देशात प्रत्येकजण त्याच्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी करायला लागले. परंतु गेल्या काही दिवसात भारतात अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत. त्यावरून असे वाटत आहे की, आपल्या भारतात केवळ पुरुष स्वतंत्र झालेले आहेत. महिलांना अजूनही भीतीत आणि बंधनात रहावे लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून आपल्या भारतामध्ये अनेक महिला अत्याचाराच्या घटना समोर आलेल्या आहेत.
अशातच आता पश्चिम बंगालमध्ये(West Bangal) याबाबत एक ऐतिहासिक विधेयक सरकारने मंजूर केलेले आहे.या विधेयानुसार बलात्कार करण्याचा तपास हा 21 दिवसांमध्ये पूर्ण करायचा आहे. तसेच आरोपीला फाशीच्या शिक्षेची तरतूद देखील विधेयकामध्ये करण्यात आलेली आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी बलात्कार विरोधी विधेयक विधानसभेत मांडलेले आहे. आणि हे विधेयक मंजूर देखील करण्यात आलेले आहे. भाजपाने देखील याला समर्थन दिलेली आहे. अशी देखील तरतूद करण्यात आलेली आहे.
ममता बॅनर्जी यांनी काढलेल्या या विधेयकात असे म्हटलेले आहे की, बलात्कार प्रकरणाचा तपास हा 21 दिवसात पूर्ण झाला पाहिजे. या विधेयकाला पश्चिम बंगाल गुन्हेगारी कायदा आणि सुधारणा 2024 असे नाव देण्यात आलेले आहे.
हे विधेयक मंजूर करण्यासाठी विधानसभेचे दोन दिवशी अधिवेशन बोलवण्यात आले होते. यावेळी ममता बॅनर्जी यांनी हे विधेयक मांडले आणि त्याला सगळ्यांनी पाठिंबा देखील दिलेला आहे. सभागृहात हे विधेयक बहुमताने मंजूर देखील करण्यात आलेले आहे. त्यामुळे आता पश्चिम बंगालमध्ये बलात्कारांना अजिबात सुट्टी मिळणार नाही 21 दिवसात त्याचा तपास करून त्यांना फाशीची शिक्षा देखील होणार आहे.