पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जीच ठरल्या वाघीण ; तृणमूल काँग्रेस 200 च्या जवळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाची मतमोजणी सुरू आहे. दरम्यान ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने जोरदार आघाडी घेतली आहे. तृणमूल काँग्रेस तब्बल 197 जागांवर आघाडीवर असून भाजपसाठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे.

यंदाच्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपने जोरदार तयारी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळाने जोर लावत बंगाल मध्ये अनेक सभा घेतल्या होत्या.तरीही ममता बॅनर्जी यांनी हार न मानता अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जोरदार लढाई दिली.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment