भारतातील ‘हे’ राज्य शालेय पाठ्यक्रमात समावेश करणार ‘कोरोनाचा धडा’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोलकाता । जागतिक कोरोना महामारीचा पार्श्वभूमीवर यासंदर्भातील माहिती देणारा एक धडा शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याच्या प्रस्तावावर पश्चिम बंगाल राज्याचा शालेय शिक्षण विभाग विचार करत आहे. पश्चिम बंगालच्या शालेय शिक्षण विभागातील अभ्यासक्रम समितीतील एका अधिकाऱ्याने मंगळवारी ही माहिती दिली. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून हा धडा पाठ्यक्रमात समाविष्ट होईल.

‘कोरोनासंदर्भातील धडा पाठ्यक्रमात समाविष्ट करण्याच्या दृष्टीने आम्ही पाठ्यपुस्तक अभ्यासक्रम समितीचे सदस्य आणि तज्ज्ञांशी चर्चा करत आहोत,’ अशी माहिती अभ्यासक्रम समितीचे अध्यक्ष अवीक मजुमदार यांनी दिली. प्राथमिक वर्गांपासून माध्यमिकच्या वर्गांपर्यंत कोरोना व्हायरससंबंधातील धडा अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती अन्य एका अधिकाऱ्यांनेही दिली.

प्राथमिक स्वच्छतेची माहिती, सुरक्षिततेच्या दृष्टीने घ्यायची खबरदारी अशी माहिती प्राथमिकच्या वर्गांना तर साथीच्या आजारांचे प्रकार, स्वरुपाचा कोविड – १९ च्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या आढाव्याचा अभ्यास उच्च माध्यमिक वर्गांना असणार आहे, अशी माहिती या अधिकाऱ्यांनी दिली. ‘या धड्यातील तपशील काय असेल याविषयी शिक्षक आणि शिक्षण तज्ज्ञांव्यतिरिक्त आम्ही डॉक्टर्स, व्हायरॉलॉजिस्ट्स, एपिडेमिऑलॉजिस्ट्स आदींची मतेही घेणार आहोत,’ असंही मजुमदार म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment