पुन्हा एकदा रेल्वे अपघात!! 2 गाड्यांची एकमेकांना धडक; 12 डब्बे पलटी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओडिशा येथील रेल्वे अपघाताची घटना अजूनही ताजी असताना आता पश्चिम बंगाल मध्ये अजून एक रेल्वेचा अपघात झाला आहे. यावेळी 2 मालगाड्यांची एकमेकांना धडक दिली. या अपघातात मालगाडीचे 12 डब्बे रुळावरून घसरले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु मालगाडीचा मोटरमन जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा रेल्वे अपघात आज पहाटे 4 वाजता पश्चिम बंगाल मधील बांकुरा येथे झाला. एक मालगाडी ओंडा स्थानकावरून जात असतानाच मागून दुसऱ्या मालगाडीने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की या धडकेत तब्बल 12 डबे रुळावरून घसरले. रेल्वेच्या धडकेचा आवाज येताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी मोटरमन ला हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

या दुर्घटनेमुळे आद्रा-खडगपूर शाखेवरील गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. या अपघातानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, दोन्ही मालगाड्या रिकाम्या होत्या, तसेच हा अपघात नेमका कशामुळे झाला? मालगाड्यांची टक्कर कशी झाली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.