West Indies Cricketer Rape Case : वेस्ट इंडिजच्या ‘या’ क्रिकेटपटूवर 11 महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप

West Indies Cricketer Rape Case (1)
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन West Indies Cricketer Rape Case। क्रिकेट विश्वातून एक हादरवणारी बातमी समोर येत आहे. वेस्ट इंडिजच्या क्रिकेटपटूवर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. १ – २ नव्हे तर तब्बल ११ महिलांचे या क्रिकेटपटूंने लैंगिक शोषण केलं असल्याचं समोर येत आहे. सदर खेळाडूचे नाव अजून समोर आलेलं नाही. परंतु गयाना येथील वृत्तपत्र कैतेऊर स्पोर्ट्सच्या खुलास्यानुसार हा खेळाडू मूळचा गयानाचा आहे आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या २०२४ कसोटी विजयाचा भाग होता. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने मात्र या संपूर्ण विषयांवर अधिक बोलण्यास नकार दिला आहे. या एकूण घटनेने वेस्ट इंडिज क्रिकेटवर नामुष्कीची वेळ आली आहे.

खेळाडूच्या कृत्यांना सुद्धा लपविण्याचे काम- West Indies Cricketer Rape Case

वेस्ट इंडिजमधील माध्यमांच्या वृत्तानुसार, वेस्ट इंडिजमधील एका अज्ञात पुरुष क्रिकेटपटूवर लैंगिक छळ (West Indies Cricketer Rape Case) आणि बलात्काराचे अनेक आरोप करण्यात आले आहेत. कॅरिबियन-आधारित स्पोर्ट्समॅक्स टीव्हीच्या व्हिडिओ रिपोर्टनुसार, ज्या क्रिकेटपटूबद्दल चर्चा सुरु आहे तो गयानाचा आहे आणि सध्याच्या राष्ट्रीय संघाचा भाग आहे. व्हिडिओ रिपोर्टमधील माहितीमध्ये असे म्हटले आहे की किमान ११ महिलांनी या क्रिकेटपटूवर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. त्यापैकी एक किशोरवयीन आहे. परंतु अजूनही या क्रिकेटपटूवर कोणतेही आरोप दाखल झालेले नाहीत. खेळाडू आणि त्याच्या कृत्यांना सुद्धा लपविण्याचे काम मोठ्या प्रमाणात करण्यात आलं आहे. एवढच नव्हे तर क्रिकेट वेस्ट इंडिज (CWI) ने देखील या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला आहे.

वेस्ट इंडिज क्रिकेटचे अध्यक्ष किशोर शैलो यांनी म्हंटल कि, या एकूण सर्व प्रकारची माहिती क्रिकेट वेस्ट इंडिजला नाही , त्यामुळे यावर सध्या भाष्य करणे योग्य नाही. तर दोन वर्षांपूर्वी कथित पीडितांपैकी एकाने संपर्क साधलेल्या वकील निगेल ह्यूजेस यांच्या मते, सदर खेळाडू जानेवारी २०२४ मध्ये ब्रिस्बेनमधील गाब्बा येथे ऑस्ट्रेलियाचा पराभूत करणाऱ्या वेस्ट इंडिज संघाचा भाग होता. मात्र हा खेळाडू नेमका आहे तरी कोण ते नाव उघड झालेले नाही.