नवी दिल्ली । मागील २ दिवसांपासून पश्चिम विदर्भासह अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील सर्व नदी-नाले दुथडी भरून व्हायला लागले आहेत. अमरावती विभागातील सर्वात मोठं व अमरावती शहराला पाणीपुरवठा करणारा मोर्शी येथील अप्पर वर्धा धरण सध्या १०० टक्के भरले आहे.
तसेच मोठ्या प्रमाणात पावसाचा धरणात पाण्याचा येवा सुरू असल्याने या धरणाचे १३ दरवाजे तब्बल २ सेंटीमीटरने उघडण्यात आले. यामधून ३७०८ घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग केला जात आहे. या धरणाचे पाणी वर्धा नदी पात्रात सोडण्यात आल्याने वर्धा नदीला पूर आला आहे.
त्यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून प्रशासनाचे सर्व अधिकारी या परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे तर कौडण्यापुर येथील पूल रहदारीसाठी प्रशासनाने बंद केला आहे. आतापर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणावर धरणाचे उंच दरवाजे उघडण्यात आल्याची ही पहिलीच घटना आहे तर आजही दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता असून सकाळ पासून जोरदार पाऊस सुरू आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.