पुढील ३ महिने इतके असेल विमान प्रवास भाडं; केंद्रानं केले किमान आणि कमाल तिकीट दर निश्चित

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । विमान प्रवासासाठी पुढचे तीन महिने किमान आणि कमाल तिकिट दर निश्चित करण्यात आल्याची घोषणा केंद्राकडून करण्यात आली आहे. नागरी उड्डाण मंत्री हरदीप पुरी यांनी या संदर्भातली पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी ही घोषणा केली आहे. येत्या २५ मेपासून देशांतर्गत विमान उड्डाणांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे एसओपी म्हणजेच स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स मंत्रालयाकडून जारी करण्यात आल्या, ज्यात तिकीट दरांचाही समावेश होता. विमान उड्डाणांचं सात श्रेणींमध्ये वर्गीकरण करण्यात आलं असून मुंबई ते दिल्ली हे भाडं ३ हजार ५०० रुपये ते १० हजार रुपयांपर्यंत असेल पुरी यांनी स्पष्ट केलं. २४ ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत हे दर निश्चित असतील असंही पुरी यांनी सांगितलं. देशांतर्गत विमान प्रवासासाठी ही दरनिश्चिती करण्यात आली आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आतापर्यंत विमान कंपन्यांकडून किमान ते कमाल तिकीट दर संबंधित वेबसाइटवर दाखवला जायचा. पण आता विमान तिकीट परवडणारं असावं, त्यामुळे किमान आणि कमाल तिकीट निश्चित करण्यात आल्याचं हरदीप सिंह पुरी यांनी म्हटलं आहे. दिल्ली ते मुंबईसाठी किमान तिकीट दर ३५०० ते कमाल तिकीट १० हजार रुपयांपर्यंत असेल. मेट्रो ते मेट्रो शहराच्या प्रवासासाठी २०२० च्या उन्हाळ्यातील वेळापत्रकानुसार एक तृतीयांश म्हणजेच ३३.३३ टक्के विमानांना परवानगी देण्यात आली आहे. तर मेट्रो ते नॉन मेट्रो किंवा या उलट उड्डाणे १०० पेक्षा जास्त आहेत.

दिल्ली, मुंबई, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकाता या शहरांचा मेट्रो शहरांमध्ये समावेश होतो. विमान प्रवासाच्या अंतराचे वर्गीकरण ७ प्रकारांमध्ये करण्यात आलं आहे. यामध्ये ०-३० मिनिट, ३०-६० मिनिट, ६०-९० मिनिट, ९०-१२० मिनिट, १२०-१५० मिनिट, १५०-१८० मिनिट आणि १८० ते २१० मिनिट असं हे वर्गीकरण आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment