महिलांमध्ये का कमी होतंय Menopause चे वय? ही आहेत करणे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात मासिक पाळी महत्त्वाची असते. त्यातही मासिक पाळी नंतर रजोनिवृत्ती म्हणजेच मेनोपॉझ हा स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असते. साधारणपणे स्त्रियांचे वय 43 ते 50 वर्ष दरम्यान असल्यावर त्यांना रजोनिवृत्तीचा सामना करावा लागत होतो. परंतु आजकाल अगदी 30 ते 40 वयातील स्त्रियांना देखील रजोनिवृत्तीचा सामना करावा लागत आहे. आजकाल लोकांच्या जीवनामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे. त्यामुळे महिलांमध्ये 40 वर्षापर्यंत त्यांना रजोनिवृत्तीचा सामना करावा लागतो. आता स्त्रियांमधील रजोनिवृत्तीची नक्की कारणे कोणती आहेत?आणि ते कसे टाळता येईल? याबद्दल माहिती आपण जाणून घेणार आहोत.

रजोनिवृत्ती म्हणजे काय ?

रजोनिवृत्ती ही स्त्रियांमधील एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. म्हणजेच प्रत्येक महिलांमध्ये एका ठराविक वयानंतर त्यांची मासिक पाळी कायमची बंद होते. काही वर्षापूर्वी साधारणता 45 ते 55 वर्षे वयोगटातील महिलांमध्ये अशी प्रक्रिया घडायची. परंतु आजकाल रजोनिवृत्तीचे वय खूप कमी झालेले आहे. अगदी 30 ते 40 वयातील महिलांना देखील रजोनिवृत्तीचा सामना करावा लागतो.

रजोनिवृत्ती दरम्यान स्त्रियांना दोन टप्प्यातून जावे लागते. सुरुवातीला मासिक पाळी पूर्णपणे थांबत नाही, तर ती अनियमित होते. या काळात मासिक पाळीमधील अंतर वाढते किंवा कधीकधी मासिक पाळी अचानक थांबते. आणि नंतर पुन्हा सुरू होते. यावेळी महिलांच्या शरीरामध्ये अनेक हार्मोनल बदल होत असतात. परंतु जेव्हा सलग 12 महिने मासिक पाळी येत नाही. यावेळी महिलांची रजोनिवृत्ती चालू होते. आता रजोनिवृत्ती लवकर येण्यामागे कोणती कारणे आहेत? हे आपण जाणून घेणार आहोत.

खराब जीवनशैली

लोकांची जीवनशैली बदललेली आहे. त्यामुळे त्यांच्या खाण्याच्या सवयींचा त्यांच्या आरोग्य विपरीत परिणाम होत आहे. लोकं जंक फूड जास्त प्रमाणात खातात. यामुळे महिलांचे रजोनिवृत्तीचे वय कमी होऊ लागलेले आहे. तसेच शारीरिक व्यायाम देखील करत नाही. आणि मानसिक तणाव वाढल्यामुळे रजोनिवृत्ती लवकर येते.

मानसिक ताण आणि आरोग्य

आजकाल महिलांमध्ये मानसिक तणाव ही एक सामान्य समस्या बनत चाललेली आहे. घरगुती परिस्थिती जबाबदाऱ्या सामाजिक दबाव यामुळे अनेकवेळा महिलांना मानसिक तणावाचा सामना करावा लागतो. यामुळे शरीरातील स्ट्रेस हार्मोनची पातळी वाढते. आणि शरीरातील हार्मोनल संतुलन बिघडते. त्यामुळेच महिलांना लवकरच रजो निवृत्ती येते.

अनुवंशिक कारण

अनेक महिलांमध्ये अनुवंशिक कारणामुळे देखील रजोनिवृत्ती लवकर येते. जर एखाद्या स्त्रीच्या आईला किंवा आजीला लवकर रजोनिवृत्ती आली असेल, तर तिला देखील ही प्रक्रिया लवकर सुरू होते. अनुवंशिक घटक महिलांच्या हार्मोनाल चक्रावर आणि रजोनिवृत्तीच्या वेळेवर परिणाम करतात.