Tuesday, January 7, 2025

हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारनं घेतले ‘हे’ 15 महत्वपूर्ण निर्णय

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात शिंदे- फडणवीस सरकारने काही महत्वपूर्ण निर्णय (important decisions) घेतले आहेत. या निर्णयाची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन दिली. यंदाच्या अधिवेशनात कोणते महत्वपूर्ण निर्णय (important decisions) घेतले चला जाणून घेऊया….
1) धान उत्पादकांना प्रती हेक्टरी 15 हजार बोनस मिळणार.
2) 70 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली.
3) नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पातील पहिल्या टप्प्याला 9 हजार 279 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली.
4) राज्यातील 800 हून अधिक अंगणवाड्या स्मार्ट करण्याचा ठराव घेण्यात आला.
5) समृद्धी महामार्गावर अपघात रोखण्यासाठी स्पीड गन बसवण्यात येणार आहे.
6) वडसा देसाईगंज ते गडचिरोली रेल्वे मार्गासाठी 1 हजार 86 कोटी रुपये
7) गोसेखुर्दला जलपर्यटन उभारणार असे काही महत्त्वाचे निर्णय राज्य सरकारने घेतले.
8) बुलडाण्यातील लघु पाटबंधाऱ्यांना सुधारित मान्यता देण्यात आली.
9) लोणार सरोवर पर्यटनासाठी 369 कोटी रुपये मिळणार
10) राज्यातील सिंचनाच्या संदर्भात 91 प्रकल्पांना अनुदान मिळणार
11) विदर्भात सौरऊर्जा प्रकल्पाला 4 हजार कोटी रुपये
12) नागपूर ते गोवा नवा महामार्ग बांधणार
13) अतिवृष्टीग्रस्तांना 5 हजार कोटींची मदत
14) मुंबईत 52 दवाखाने सुरू केले
15) जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे व देवेद्र फडणवीस यांनी विरोधकांना हे अधिवेशन (important decisions) विदर्भासाठी कशाप्रकारे फलदायी आहे, हे पटवून दिले.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय