सांगली प्रतिनिधी । हुतात्मा बाबू गेणू व शरद जोशी यांच्या स्मृती दिनानिमित्त शेतकरी संघटना राज्य कार्यकारणीची इस्लामपूर येथील निर्मल सांस्कृतीक भवनात शनिवारी व रविवारी होणार आहे. ऊसदर, पिक विमा, विज मंडळाची कृषी पंप थकबाकी वसुली, बियाणे फसवणुकीसह विविध विषयांवर चर्चा आहे. राज्यभरातील शेतकऱी संघटनेच्या प्रमुख 12 नेते विविध विषयावर मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिले.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी संघटना फोडून सदाभाऊ खोत यांना मंत्री केले. यामुळे त्यांना काय मिळाले असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. रघुनाथ पाटील म्हणाले, केंद्र व राज्य सरकारच्या कायद्यांनी शेतकर्यांना मारण्याचे ठरवले आहे. पिक विमा कंपन्यांनी सरकारने केलेल्या अटी व शर्थी शेतकर्यपेक्षा कंपन्यांना फायदेशीर ठरत आहेत. उंबरठा उत्पन्न काढणे, सर्वस्वी सरकारी अधिकार्यांनी हातात ठेवले आहे. बियाणे कायद्यांमध्ये जर शेतकर्यांची फसवणूक झाली तर फौजदारी कारवाईची तरतुद आहे. मात्र राज्यकर्त्यांनी कृषी अधिकार्यांमार्फत चौकशीचा कायदा केला.
दूध उत्पादनात सुध्दा भेसळीवर सरकारचे नियंत्रण नसल्यामुळे उत्पादक तोट्यात जात आहेत. दरम्यान, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी संघटना मोडून काय साध्य केले. सदाभाऊ खोत यांना आमच्यातून फोडून मंत्री करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या पक्षात लोक मिळाली नाहीत का असा सवालहि त्यांनी यावेळी केला