काय सांगता ! शहरात तब्बल 2600 कोटींची कामे सुरू 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – ऐतिहासिक औरंगाबाद शहरात एक-दोन नव्हे तर तब्बल 2 हजार 600 कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. काही कामांना मंजुरी मिळाली आहे तर काही कामे होत आली आहेत. 2600 कोटीं पैकी किमान 1 हजार कोटींचा निधी आजवर खर्च झाल्याचे दिसते आहे. उर्वरित निधी टप्प्याटप्प्याने मिळण्याची शक्यता आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीतून ही कामे केली जात आहेत. प्रगती पदांवरील कामांमध्ये ठाकरे स्मारक व स्मृतीवन क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे काम साडेतीन कोटी तुन सुरू आहे, अशी माहिती पालक मंत्री सुभाष देसाई यांनी दिली. यावेळी त्यांनी शहरात सुरू असलेल्या कामांचा पाढाच वाचला.

यावेळी पालकमंत्री देसाई यांनी सांगितले की, औरंगाबाद सफारी पार्क डीपीआर 147 कोटींचा असून 20 टक्के काम पूर्ण झाले आहे. शहर पाणीपुरवठा योजनेचे सोळाशे 80 कोटी तून काम सुरू आहे, तर दहा कोटींतून मेल्ट्रॉन येथे 345 खाटांचे हॉस्पिटल सुरू केले आहे. तसेच घनकचरा व्यवस्थापनासाठी 148 कोटी तून 72 कोटी मनपाला मिळाले आहेत अशी माहिती पालकमंत्री यांनी दिली.

शहरातील रस्त्यांसाठी 152 कोटी रुपये, स्मार्ट सिटी योजनेतून सिटी बससाठी 236 कोटी रुपये दिले. मास्टर सिस्टीम ऍन्टीग्रेटर आयटी कनेक्टिव्हिटी आणि डिजिटल सिस्टिम साठी 178 कोटी, संत एकनाथ रंग मंदिराचे नूतनीकरणासाठी 8 कोटी, तर ऐतिहासिक दरवाजांच्या संवर्धनासाठी 4 कोटी मिळाले आहेत. विभागीय क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाचे 400 मीटर चा सिंथेटिक टॅंक मंजूर झाला आहे. यासाठी 7 कोटींचा निधी खर्च होणार आहे. एकूणच शहरात कोट्यावधीची विकास कामे सुरु असून यामुळे शहराचे रुपडे पालटणार आहे, असा विश्वास पालकमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.

Leave a Comment