काय सांगता! जगभरातील 77 टक्के महिला विवाहबाह्य संबंधात; सर्वेक्षणातून माहिती समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रेमाला अनेक ठिकाणी वेगवेगळी परिभाषा दिली जाते. प्रेम म्हणजे बंधन, काळजी, मुक्ती, जबाबदारी, विचार आणि आदर अश्या प्रकारची प्रेमाची व्याख्या आजकाल सर्व ठिकाणी पाहायला मिळते. पण, आजकालच्या आधुनिक समाजामध्ये प्रेमाची व्याख्या शारीरिक आकर्षण आणि शारीरिक संबंध इथपर्यंत मर्यादित असल्याची टीका नेहमीच जुन्या पिढीकडून होत असते. विवाहबाह्य संबंधांचा पायाही याच समजातून घातला जातो.

एका सर्वेक्षणामध्ये असे दिसून आले आहे की, जगभरातून 77 टक्के महिला या विवाहबाह्य संबंधात आहेत. ‘गिल्डन’ या फ्रेंच एक्स्ट्रा म्यारीटल अफेअर्स या डेटिंग ॲपद्वारे केलेल्या सर्वेक्षणामध्ये त्यांनी हे निष्कर्ष काढले आहेत. सोबतच, त्यांनी भारतीय महिलांच्या विवाहबाह्य संबंधात वाढ झाली असल्याचे म्हटले आहे. या ॲपचा प्लॅटफॉर्म हा महिलांसाठी तयार करण्यात आला आहे.

हे ॲप खासकरून अश्या महिलांसाठी आहे ज्या आधीच रेलेशनशीपमध्ये आहेत किव्वा ज्यांचे आधीच लग्न झाले आहे. या ॲपचा मूळ उद्देश हा प्रेम, सेक्स आणि मैत्री असा आहे. भारतात या ॲपचे जवळपास 14 लाख वापरकर्ते आहेत. या वापरकर्त्यांमध्ये मुलं असलेल्या महिलाही आहेत. पतीकडून मिळत नसलेल्या लैंगिक सुखामुळे आणि त्यांच्यासाठी मिळत नसलेल्या पुरेशा वेळेमध्ये त्या विवाहबाह्य संबंधात असल्याचे निष्कर्षात म्हटले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment