औरंगाबाद – संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी सोमवारपर्यंत कामावर हजर व्हावे जे कर्मचारी निलंबित आहेत. त्यांचे निलंबन मागे घेतले जाईल, अन्यथा सोमवार नंतर कारवाई तीव्र करण्यात येईल, असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे. आतापर्यंत बडतर्फ निलंबन बदलीची कारवाई करण्यात आली आता आणखी काय करणार असा प्रश्न संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा संपाला एक महिना होऊन गेला आहे. मात्र तरीही मागणी पूर्ण होत नसल्याने बहुतांश चालक-वाहक संपावरच आहेत. परिवहन मंत्र्यांच्या इशारा मुळे कर्मचाऱ्यांनी मधून रोष व्यक्त होत आहे. यादरम्यान कामावर हजर होणाऱ्या चालक वाहकांची संख्या गेल्या तीन दिवसात वाढले आहे. शनिवारी 22 चालक आणि 36 वाहक कामावर हजर होते मध्यवर्ती बस स्थानक, सिडको बस स्थानकासह कन्नड, गंगापूर, सोयगाव या पाच आगारातून दिवसभरात 41 लालपरी धावल्या त्यातून एकूण 70 फेऱ्या झाल्या. यात 1541 प्रवाशांनी प्रवास केला.
या मार्गावर धावल्या बस –
सिडको बस स्थानकातून जालन्यासाठी 8 बस धावल्या तर मध्यवर्ती बस स्थानकातून नाशिक आणि पुण्यासाठी एकूण 20 शिवशाही बस धावल्या त्याचबरोबर कन्नड, सिल्लोड साठी साध्या बस रवाना झाल्या. ग्रामीण भागात दहेगाव बंगला, अजिंठा या मार्गावर बस धावल्या.