नखांवरील पांढरी खूण नेमकं काय दर्शवते? चला जाणून घेऊ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । समुद्रशास्त्रात आपल्या शरीरावरील प्रत्येक खुणा, तीळ, याबाबतचे महत्त्व सांगितले आहे. अनेकांच्या शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी तीळ असतात. समुद्रशास्त्राचे तज्ज्ञ सांगतात की शरीरावर बनलेल्या लहानशा खुणा तुमच्या नशिबावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे परिणाम करतात. आज आपण जाणून घेऊया नखांच्या वर असलेल्या पांढऱ्या खुणेबद्दल… नखांवरील पांढरी खून नेमकं काय दर्शवते? आपल्या जीवनावर त्याचा काय परिणाम होतो याबाबत जाणून घेऊया…

समुद्रशास्त्रानुसार अंगठ्याच्या नखेवर पांढरे चिन्ह शुभ मानले जाते. ही लोक आपले नातेसंबंध अतिशय चांगल्या प्रकारे जपतात. तसेच ज्या व्यक्तीच्या अंगठ्याच्या नखेवर पांढरे चिन्ह असते तो व्यवसायात खूप प्रगती करतात. यासोबतच अशा लोकांना आयुष्यात असा मित्र मिळू शकतो ज्याबाबत तुम्ही खूप गंभीर असू शकता.

ज्या व्यक्तीच्या तर्जनीच्या नखेवर म्हणजेच अंगठ्याजवळील बोटावर पांढरी खूण असते त्या व्यक्तीला समाजात खूप मान मिळतो आणि ती व्यक्ती प्रत्येक क्षेत्रात पैसा कमावते . तसेच नोकरी असो वा व्यवसाय, दोन्हीमध्ये त्यांचे वर्चस्व असते.

जर तुमच्या अनामिकेच्या नखेवर ही पांढरी खूण असेल तर तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. तुमच्या पाठीशी लक्ष्मीमातेची सदैव कृपा राहते आणि तुमचं जीवन संपत्ती आणि वैभवाने भरलेले असते.

ज्या व्यक्तीच्या मधल्या बोटाच्या नखेवर पांढरा डाग असतो तो खूप शुभ मानला जातो. असं मानले जाते की अशा लोकांना प्रवास करणे खूप आवडते. हे लोक त्यांच्या आयुष्यात खूप प्रवास करतात. परंतु त्यांना आपल्या शत्रूंपासून सावध राहावे लागेल.

जर करंगळीच्या नखेवर पांढरे चिन्ह असेल तर अशी व्यक्ती व्यवसायात खूप प्रगती करते तसेच विज्ञान क्षेत्रातही त्यांना खूप यश मिळते.