हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेले अंतरिम बजेट (Budget 2024) सादर केले आहे. या बजेटमध्ये सीतारामन यांनी महिलांना घेऊन अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात “लखपती दीदी” (Lakhpati Didi) योजनेचा देखील उल्लेख केला. यावर्षी मोदी सरकारने तीन कोटी महिलांना लखपती बनवण्याचे ध्येय समोर ठेवले आहे. त्यामुळे सध्या या योजनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आज आपण याच योजनेविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
लखपती दीदी योजना काय आहे?(Budget 2024)
स्वंय सहाय्यता समूहातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकारने लखपती दीदी योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी सरकारकडून 1 ते 5 लाख रुपयांपर्यंत व्याज मुक्त आर्थिक मदत करण्यात येते. महिलांच्या विकासाचा स्थर वाढवणे, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे त्यांचे उत्पन्न वाढवणे असा या योजनेमागील हेतू आहे.
9 कोटी महिला योजनेची जोडलेल्या आहेत
लखपती दीदी या योजनेअंतर्गत जोडल्या गेलेल्या महिला आपला स्वतःचा उद्योग सुरू करू शकतात. आताच्या घडीला देशामध्ये 83 स्वयं सहायता समूह आहेत. या समूहाची तब्बल नऊ कोटींपेक्षा अधिक महिला जोडलेल्या गेल्या आहेत. खरे तर ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख किंवा त्यापेक्षा अधिक आहे त्या कुटुंबातील महिलांना लखपती दिली असे म्हटले जाते. 77 स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर या योजनेची घोषणा केली होती. तेव्हापासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
केंद्र सरकार या योजनेअंतर्गत महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देत असते. इतकेच नव्हे तर, महिलांची आर्थिक समज वाढावी यासाठी वेगवेगळ्या कार्यशाळा आयोजित करण्यात येतात. या योजनेअंतर्गत महिलांना छोटे कर्ज, वोकेशनल ट्रेनिंग, इंटरप्रिनरशीप मदत, विमा कव्हरेज अशा देखील सुविधा देण्यात येतात. त्यामुळे दिवसेंदिवस या योजनेची महिला जोडत चालल्या आहेत.