हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्याच्या तरुणांमध्ये मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर वापरण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. परिणामी त्यांना लवकर चष्मा लागत आहे. अनेकवेळा तर या तरुणांना सतत चष्मा लावणे आवडत नसल्यामुळे ते चष्मा लावणेच टाळतात. परंतु असे काहीतरी करणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी नुकसानदायी ठरू शकते. त्यामुळेच आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला असे काही व्यायाम सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या डोळ्यांवरील चष्मा लवकर दूर होईल.
डोळ्यांसाठी कोणते व्यायाम करावे?
1) डोळे लुकलुकणे – डोळे लुकलुकवणे हा डोळ्यांसाठी अत्यंत फायदेशीर व्यायाम आहे. ज्या लोकांची दृष्टी कमकुवत होत चालली आहे अशा लोकांनी हा व्यायाम नक्की करावा. या व्यायामामुळे डोळ्यांच्या शिरांवर ताण पडतो, ज्यामुळे हळूहळू स्पष्ट दिसायला सुरुवात होते.
2) एका जागी लक्ष केंद्रित करणे – डोळ्यांच्या व्यायामामध्ये लक्ष केंद्रित करणे हा देखील सर्वात फायदेशीर व्यायाम ठरतो. एखादया व्यक्तीने आपली दृष्टी सुधरण्यासाठी डोळ्यांच्या बाहुल्यांना काठावर आणावे आणि नाकाकडे लक्ष केंद्रित करावे. यामुळे एकाग्रता मजबूत होते.
3) डोळे फिरवणे – डोळ्यांच्या विविध आजारांपासून दूर राहण्यासाठी डोळे फिरवण्याचा व्यायाम करावा. यासाठी एका जागी स्थीर बसून दोन्ही दिशांनी डोळे फिरवावे. असे केल्यानंतर तुमच्या डोळ्यांना क्रिया करण्यासाठी अधिक चालना मिळेल.
4) वर आणि खाली पाहणे- हा व्यायाम केल्यानंतर सतत चष्मा लावण्याची तुमची समस्या दूर होऊन जाईल. यासाठी तुम्हाला तुमच्या डोळ्यांच्या बाहुल्या काही काळ सतत वाढवाव्या लागतील आणि पुन्हा कमी कराव्या लागतील.
डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि लवकर चष्मा हटवण्यासाठी हे व्यायाम दररोज करून पहावेत.
व्यायामाचे फायदे
शरीरातील इतर भागांबरोबर डोळ्यांची निगा राखणे देखील तितकेच महत्त्वाचे असते. त्यामुळे आपण ज्या पद्धतीने चालण्याचा, पळण्याचा, व्यायाम करतो त्याच पद्धतीने डोळ्यांचा व्यायाम करणे देखील आवश्यक आहे. डोळ्यांचा व्यायाम केल्यामुळे लवकर दृष्टी जाणार नाही. तसेच डोळ्यांची एकाग्रता वाढेल. तुम्हाला डोळ्यांसाठी कोणतेही औषध घ्यावे लागणार नाही. डोळ्यांवर अधिक ताण येणार नाही.