चीन मधून परतलेल्या त्या १२ जहाजांमध्ये असं काय होत? की युरोपात लाखो जणांचा मृत्यू झाला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील बहुतेक सर्व देश कोरोना विषाणूच्या चक्रात अडकले आहेत.२४ लाखाहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे ज्यामधील १ लाख ६५ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान हा विषाणू अधिक पसरू नये म्हणून बरेच देश लॉकडाउनचा अवलंब करत आहेत.मात्र शेकडो वर्षांपूर्वी जेव्हा असाच एक साथीचा रोग पसरला होता तेव्हा प्रतिबंध किंवा प्रतिबंध करण्याच्या पद्धती एकमेकांपर्यंत पोहोचविण्याचा कोणताही मार्ग उपलब्ध नव्हता. हा रोग इतका प्राणघातक होता की त्याला ब्लॅक डेथ म्हटले जाऊ लागले.

बंदरातून परत आलेल्या जहाजात होती मृत शरीरे

ह्या आजाराची सुरुवात तेव्हा झाली जेव्हा इटलीमधील सिसिलियन बंदर इथे १२ जहाजे किनाऱ्याला लागली.तेथूनच ऑक्टोबर १३४७ मध्ये हा आजार सुरू झाला.जहाजात असलेल्या लोकांची कुटुंबं जहाजावर असलेल्या लोकांची वाट पाहत किनाऱ्यावरच उभी होती.जहाज किनाऱ्याला लागल्यानंतरही बरेच जण जहाजातून खाली उतरले नाहीत तेव्हा खाली थांबलेली माणसे जहावर आली.तिथली दृश्ये पाहिल्यावर ते अक्षरशः किंचाळतच बाहेर आले.जहाजात मृतदेहांचा ढीगच लागलेला होता.केवळ काही लोकच जिवंत होते.त्यांनाही खाली आणले गेले आणि बरे होण्याची वाट पहिली गेली.

वाचलेल्यांची प्रकृतीही काही फारसी चांगली नव्हती, त्यांच्या शरीरावर पुरळ उठले होते, ज्यामधून पू आणि रक्तस्त्राव होत होता.ते लोक बरे झाले नाहीत, परंतु त्यांची काळजी घेत असलेले लोकही अचानक आजारी पडू लागले.पुढच्या ५ वर्षांत त्या १२ जहाजांमुळे युरोपमध्ये २० दशलक्षाहून अधिक लोकांचा जीव गेला. मृत्यूच्या अचूक आकडेवारीचा अजूनपर्यंत खुलासा होऊ शकलेला नाही, परंतु असे मानले जाते की युरोपियन लोकसंख्येपैकी एक तृतीयांश लोकांचा यामध्ये मृत्यू झाला.त्यानंतर या जहाजांना डेथ शिप असे म्हंटले गेले.

China Finds a G-7 Ally, Italy, for Belt and Road - Bloomberg

अशी सुरुवात झाली
वास्तविक इटली आणि युरोपच्या इतर देशांपर्यंत पोहोचण्या आधीपासूनच चीनमध्ये प्लेगची सुरूवात झाली होती.इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार सुमारे २००० वर्षांपूर्वी चीनमुळे एक विशेष प्रकारचा प्लेग इतर देशांत पसरू लागला. हे बर्‍याचदा व्यापारी जहाजांद्वारे पसरले जात असे. १३४० नंतर,या प्लेगने पुन्हा एकदा चीनमध्ये डोके वर काढल.पण पण नंतर मात्र ते इतर खंडांमध्येही खूप वेगाने पसरू लागले. इ.स. १३४६.साली चीनमध्ये जेव्हा प्लेग झालेला तेव्हा युरोपची १२ जहाजे चीनच्या सीमेवर आलेली होती.

रोगाचा वेगाने प्रसार
प्लेगची लागण झालेले उंदीर इतर वस्तूंसोबतच जहाजावर पोहोचले आणि त्यांच्या परतीच्या मार्गावर पुढच्या ४ आठवड्यांत हे संक्रमण जहाजावरील प्रत्येक माणसामध्ये पसरले. त्यामध्ये व्यापारी, नाविक तसेच इतर कर्मचारीही होते. लवकरच जहाज मृतदेह आणि आजारी माणसांनी भरून गेले. इटलीला पोहोचताच हा आजार या जहाजाच्या माध्यमातून इतरांपर्यंत पोहोचला आणि सुमारे ८ महिन्यांच्या आत हा आजार आफ्रिका, इटली, स्पेन, इंग्लंड, फ्रान्स, ऑस्ट्रिया, हंगेरी, स्वित्झर्लंड, जर्मनी, स्कॅन्डिनेव्हिया आणि बाल्टिक आदी देशांमध्ये पसरला.

Bubonic Plague Victims In Art Are Often Suffering From Leprosy ...

ब्लॅक डेथची लक्षणे
याबद्दल कोणताही ठाम पुरावा नाही, परंतु नंतर इटालियन लेखक जिओव्हानी बोकाकासिओ यांनी लिहिले की त्यावेळी युरोपमध्ये २ प्रकारचे प्लेग होते. पहिला न्यूमोनिक होता, ज्यामध्ये तीव्र ताप आणि रक्ताच्या उलट्या व्हायच्या आणि ३ दिवसांच्या आत रुग्णाचा मृत्यू . दुसरा बुबोनिक प्लेग होता. त्यास ब्लॅक डेथ असे नाव देण्यात आले होते. यात, पुरळ पेशंटच्या मांडी आणि शरीरावर उद्भवू उद्भवू लागत, त्यांच्यात पू होऊन जास्त ताप येत असे आणि या संसर्गाच्या अवघ्या काही दिवसांतच मरण व्हायचा. हे इतक्या वेगाने पसरले की निरोगी लोक देखील एका रात्रीत मरत असत.

प्रत्यक्षात काय होते
आज शास्त्रज्ञांना हे समजले आहे की १३ व्या शतकात कोट्यावधी मृत्यूसाठी जबाबदार असलेला ब्लॅक डेथ हा एक प्लेग रोग होता. फ्रान्सच्या Alexandre Yersin यांनी १९ व्या शतकात याचा शोध लावला आणि तो Yersina pestis नावाच्या बॅसिलसच्या माध्यमातून पसरल्याचे त्यांनी सांगितले. १३ व्या शतकातही या आजाराच्या कहरामध्ये लोकांना हे समजण्यास सुरवात झाली की हा रोग हवेमधून किंवा संक्रमित व्यक्तीला स्पर्श होण्याने पसरतो. पण यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे ती जहाजे आहेत जी विशेषत: व्यापारासाठी चीनमध्ये जात असत.

उपचार कसे होते
त्याकाळी उपचारासाठी विचित्र पद्धतींचा उपयोग केला गेला. त्यावेळी प्लेग झालेल्या भागावर गरम पाणी ओतणे किंवा गरम सळईने त्या भागाला डाग घालणे असे उपचार केले जायचे. या अशा उपचारादरम्यानच बहुतांश रुग्णांचा मृत्यू झाला. लवकरच युरोपमधील लोकांनी या रोगाला देवाची नाराजी म्हणून स्वीकारण्यास सुरुवात केली.यातून बाहेर पडण्याचे मार्गही शोधू लागले.यादरम्यानच,एक विचित्र आणि भयंकर प्रथा जन्माला आली,जिच्यावर विश्वास ठेवणारे देवाचा हा क्रोध टाळण्यासाठी स्वत: ला चाबकाने फटके मारून घेत असत, त्यांना Flagellants म्हणत.हे लोक दिवसातून ३ वेळा ३३ दिवस स्वतःला चाबूक मारायचे. हळूहळू ही प्रथा लोकप्रिय झाली,परंतु त्यानंतरही प्लेगने काही पाठलाग सोडला नाही.

आइसोलेशन आणि क्वारंटाइनची झाली सुरूवात
सुमारे पाच वर्षे युरोपमधील लोक याला बळी पडले. अखेर त्यांना एक मार्ग सापडला.जहाजे संसर्गग्रस्त नाहीत हे सिद्ध होईपर्यंत लोकांनी चीन किंवा आशियाबरोबर व्यापारातून परत येणारी जहाजे आइसोलेट ठेवण्यास सुरवात केली. पूर्वी हा आइसोलेशनचा कालावधी ३० दिवसांचा होता, ज्यास trentino असे म्हणत. आज, कोरोनाच्या बाबतीत, याला क्वारंटाइन ठेवणे म्हणतात. आता प्लेगचा कहर जवळजवळ संपला आहे, परंतु तरीही जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मते दरवर्षी हजार ते ३ हजार लोक याला बळी पडतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Bubonic plague: Fourth case of the 'Black Death' confirmed in ...

Leave a Comment